September 21, 2026

ज्ञानप्रसार विद्यालय मोहा येथे सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांचा विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागात वाढदिवस साजरा

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानप्रसार विद्यालय,मोहा येथे दि.५ जानेवारी २०२६ रोजी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांचा वाढदिवस अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमात इयत्ता ५ वी व ६ वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शेवाळे सरांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमासाठी प्रशालेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे तसेच ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा संस्थेचे कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर हे आवर्जून उपस्थित होते.

  • शेवाळे सरांच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या सामाजिक जाणीवेचा आदर्श ठेवत त्यांनी या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य म्हणून वह्या व पेनाचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय परजणे यांनी केले,तर आभार प्रदर्शन श्रीमती उषा पांचाळ मॅडम यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी चिलवंत राजाभाऊ व ज्ञानोबा टोपे यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!