February 8, 2026

कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर; कुलकर्णी,यादव, रणदिवे, कांबळे सन्मानित

  • येरमाळा पत्रकार संघ ‘उत्कृष्ट संघ’, तर तुळजाई प्रतिष्ठानला समाजसेवा पुरस्कार
    कळंब – तालुका पत्रकार संघाचे मानाचे वार्षिक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून या वर्षी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मान्यवरांचा गौरव होणार आहे.समाजसेवेसाठी शहाजी चव्हाण यांच्या तुळजाई प्रतिष्ठानला समाजसेवा पुरस्कार, तर पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल दिल्ली येथील निलेशकुमार कुलकर्णी,सांगोला येथील राजेंद्र यादव,पुण्याचे शिरीष रणदिवे आणि उमरगा येथील निळकंठ कांबळे यांची निवड करण्यात आली आहे.तसेच आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार ईटकुर जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनिल शिंदे यांना जाहीर करण्यात आला आहे.
    या पुरस्कारांचे यंदा २७ वे वर्ष असून, फेब्रुवारी महिन्यात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
    पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार संघाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून यंदाचे पुरस्कार निश्चित करण्यात आले.
    जाहीर झालेले पुरस्कार पुढीलप्रमाणे :
    शि.म. ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार – निलेशकुमार कुलकर्णी (दिल्ली),स्वा.सैनिक शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार – राजेंद्र यादव (सांगोला),रा.ई. काकडे शोध पत्रकारिता पुरस्कार – शिरीष रणदिवे (पुणे),स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – निळकंठ कांबळे (उमरगा), स्वा. सै.शकुंतला देशपांडे समाजसेवा पुरस्कार – शहाजी चव्हाण यांची तुळजाई प्रतिष्ठान,स्व.सुधाकर सावळे उत्कृष्ट पत्रकार संघ पुरस्कार – येरमाळा पत्रकार संघ, स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार – अनिल शिंदे (क्रीडा शिक्षक)
    फेब्रुवारीत होणाऱ्या भव्य कार्यक्रमात सर्व पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून,पत्रकार संघाच्या वतीने सर्व विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!