February 8, 2026

स्त्री शिक्षणाच्या जननींना अभिवादन;ज्ञानोद्योग विद्यालयात जयंतीनिमित्त सांस्कृतिक उपक्रम संपन्न

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी ज्ञानोद्योग विद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यालयातील सहशिक्षिका श्रीमती सिना सिरसठ यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    सांस्कृतिक विभागप्रमुख दिलीप मोरे यांच्या पुढाकाराने निबंध व भाषण स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या प्रेरणादायी कार्यावर आधारित सुमधुर गीते, प्रभावी भाषणे सादर करून स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. विशेषतः इयत्ता ५ वी ते ८ वीतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत सादरीकरण करून कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण प्राप्त करून दिले.
    या प्रसंगी श्रीमती सिना सिरसठ यांनी सावित्रीबाईंच्या कार्याविषयी मार्गदर्शन केले, तर सहशिक्षक अनिल शिंदे यांनीही विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ शिक्षक डी.बी.मोरे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस.व्ही. पेजगुडे यांनी केले तर आभारप्रदर्शन क्रीडाशिक्षक बी. जी. चांदणे यांनी मानले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले.
error: Content is protected !!