February 8, 2026

जि.प.शाळा तांदुळवाडी येथे ‘सावित्री–जिजाऊ’ महोत्सव; विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन

  • कळंब – तालुक्यातील मौजे तांदुळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीपासून ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीपर्यंत ‘सावित्री-जिजाऊ महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रमुख श्रीमती आशा पवार यांच्या नेतृत्वाखाली शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धांद्वारे गुणात्मक बाबींचा विकास व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
    या महोत्सवांतर्गत दररोज वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये वेशभूषा,वक्तृत्व,गायन,वादन, स्मरणशक्ती,सामान्य ज्ञान,सुंदर हस्ताक्षर अशा विविध स्पर्धांचा समावेश आहे. या स्पर्धांमधील विजेत्यांना प्रजासत्ताक दिनी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहेत.
    या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक संतोष भोजने, सहशिक्षक संतोष मोहिते, सयाजी शिंदे आणि श्रीमती रसिका आगरकर परिश्रम घेत आहेत.
error: Content is protected !!