March 25, 2026

जनसेवेची परंपरा कायम; नगरसेवक रत्नकांत ‘पापा’ शिंदे यांचा प्राध्यापकांकडून सत्कार

  • परांडा— परांडा येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तसेच समाजकार्याची अखंड परंपरा जपणारे रत्नकांत उर्फ ‘पापा’ शिंदे यांच्या आई सौ. वनमाला रामा शिंदे या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत प्रभाग क्र.१० मधून भरघोस मतांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्याने रत्नकांत उर्फ ‘पापा’ शिंदे यांचा महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
    या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा.किरण देशमुख, ग्रंथपाल डॉ.राहुल देशमुख,प्रा. अनंत अनभुले आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते पुस्तक व शाल देऊन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
    विद्यार्थीदशेपासूनच राजकारणाची आवड जपणाऱ्या रत्नकांत शिंदे यांनी २०१६ मध्येही नगरपरिषद निवडणूक जिंकून सभापतीपदाची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली होती. विविध शासकीय कार्यालयांत येणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची निस्वार्थ सेवा करून त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे.
    परंडा शहराच्या विकासासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली असून आगामी पंचवार्षिक काळात शहराचा कायापालट करण्याचा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
error: Content is protected !!