March 26, 2026

कळंब येथे संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीची स्थापना

  • कळंब — येथील श्री संत गुरू रविदास महाराज यांची जयंती रविवार, दि.०१ फेब्रुवारी २०२६ रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे.या निमित्ताने विद्यानगरीतील श्री संत रविदास महाराज मंदिर परिसरात भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जयंती उत्सव यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संत रविदास महाराज जयंती उत्सव समितीची स्थापना करण्यात आली आहे.
    राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीस मराठवाडा युवक अध्यक्ष विकास कदम यांनी अध्यक्षस्थानी राहून मार्गदर्शन केले.जयंती निमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार समारंभ दि. ०१ फेब्रुवारी रोजी आयोजित केला जाणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
  • नवनियुक्त समितीत अध्यक्ष म्हणून सतीश कदम,उपाध्यक्ष म्हणून श्याम शिंदे व डॉ.संजित पाखरे, सचिव म्हणून लिंबराज ठोंबरे व शिवाजी शिंदे,सहसचिव म्हणून रंगनाथ कदम व संपत शिंदे यांची निवड करण्यात आली. तर मार्गदर्शक प्रा.जालिंदर लोहकरे व बाबासाहेब कांबळे,कोषाध्यक्ष भिकचंद शेवाळे,कार्यक्रम प्रमुख परमेश्वर कदम व सुदाम शिंदे आणि सल्लागार म्हणून महादेव ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली.
    या बैठकीचे आयोजन महासंघाचे तालुकाध्यक्ष अशोक लाड यांनी केले होते.जयंती उत्सव भव्य आणि अनुकरणीय होणार असल्याची भावना बैठकीतून व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!