लातूर (मिलिंद धावारे यांजकडून) – तथागत बुद्धाने सर्व मानव जाती करीता आपल्या नितिमान धम्माची शिकवण दिली आहे.सर्व जीव प्राण्यांचे कल्याण व्हावे यासाठी करुणा,मैत्री आणि अहिंसा या उच्च तत्वाचा उपदेश केला आहे. भवतु सब्ब मंगल आणि बहुजन हिताय सुखाय हा विश्व कल्यानाचा मार्ग बुद्धाने सर्वप्रथम सांगितलेला आहे त्यामुळे तथागत बुध्दाचा विचार हा मानवतेच्या हिताचा विचार असल्याचे प्रतिपादन अ. भा.भिक्खु संघांचे संघनायक पू. भिक्खु करुणानंद महाथेरो (दिल्ली) यांनी केले आहे. बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल ट्रस्ट व समस्त बौध्द उपासक-उपासिकांच्यावतीने डॉ. भिक्खु उपगुप्त महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली व भिक्खु पय्यानंद थेरो यांच्या संयोजनाद्वारे महाविहार,धम्म संस्कार केंद्र, बार्शी रोड,सातकर्णी नगर,रामेगाव ता.जि.लातूर येथे एक दिवशीय आठवी अ.भा.बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. धम्म परिषदेच्या सकाळच्या पहिल्या सत्रात आंबेडकर चौक आणि बौध्द नगर येथून पंचरंगी ध्वजारोहण करून महापुरुषांच्या मुर्तीसह भिक्खु संघ आणि बौध्द उपासक-उपासिका यांची भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे मिरवणुकीचे समापन झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकास सर्व कार्यकर्ते यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.भिक्खु पय्याबोधी थेरो यांच्या हस्ते ध्वजारोहन करून त्रिशरण पंचशिल वंदना घेण्यात आली.
धम्म परिषदेच्या दुपारच्या दुसऱ्या उदघाट्कीय सत्रात अ.भा.भिक्खु संघांचे संघनायक भिक्खु करुणानंद महाथेरो (दिल्ली) यांच्या हस्ते पूज्य भिक्खु संघ, प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले.यावेळी हजारोच्या संख्येने बौध्द जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी सामूहिक बुद्ध वदंना करून भिक्खु संघांचे व मान्यवरांचे स्वागत केले गेले.यावेळी ‘सातकर्णी’ स्मरणिके सहीत आर्या मेत्ता,डॉ.ना.गायकवाड यांच्याही ग्रंथाचे प्रकाशन सर्वांच्या हस्ते करण्यात आले. आठव्या बौध्द धम्म परिषदेस विशेष अतिथी म्हणून प्रख्यात सिने अभिनेते गगन मलिक,माजी मंत्री आ.अमित देशमुख,माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना गगन मलिक म्हणाले की,बौध्द समूहाने धम्माचे तंतोतंत पालन करून भारतात बौध्द धम्म प्रसारित करण्यासाठी बौध्द अनुयायांनी उत्साहात काम करणे आवश्यक आहे. यावेळी बोलताना माजी मंत्री आ. संजय बनसोडे म्हणाले की,बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरिटेबल संस्था ही लातूर जिल्ह्यात बौध्द धम्माचे प्रभावी काम करत असल्याचे नमूद करीत महाविहार धम्म संस्कार केंद्रास येणाऱ्या काळात तीर्थक्षेत्र विकासाचा ‘ब’ दर्जा प्राप्त करून व विकास निधी मिळवून देण्याचे आश्वासनत्यांनी दिले. यावेळी बोलताना माजी मंत्री आ. अमित देशमुख म्हणाले की,बौध्द धम्म हा भारताचा मुळ धर्म आहे. गौतम बुध्दामुळे भारताची जगात विशेष ओळख आहे.पानगाव येथील चैत्य स्मारक व महाविहार सातकर्णी नगर हे दोन्ही श्रद्धास्थाने लातूर जिल्ह्यातील प्रमुख केंद्रे आहेत.महाविहार सातकर्णी नगर धम्म केंद्र हे येणाऱ्या काळात बौध्द धम्माची बुध्दसृष्टी साकारण्यासाठी स्वतः कठीबद्द असल्याचे अभिवचन त्यांनी दिले.
यावेळी श्रीलंकेचे माजी खासदार भिक्खु अतुरलीये रतन महाथेरो यांच्या सह,डॉ.खेमधम्मो महाथेरो, प्राचार्य सत्यपाल महाथेरो,डॉ. इंदवंस महाथेरो,भिक्खु करुणानंद महाथेरो,भिक्खु नागसेन,भिक्खु पय्याबोधी थेरो,भिक्खु धम्मबोधी थेरो,भिक्खु सुमेध नागसेन इत्यादी भिक्खुंची धम्मदेशना रात्री उशिरा पर्यंत झाली. यावेळी भिक्खु धम्मानंद महाथेरो, शिलरत्न थेरो,सुभूती थेरो, नागसेनबोधी थेरो,भंते बोधीराज, भंते पय्यावंस इत्यादी मोठ्या संख्येने भिक्खु संघ उपस्थित होते. धम्मदेशने नंतर प्रसिद्ध गायक विकास राजा (नागपूर) यांचा बुध्द-भीम गीतांचा प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. या परिषदेस आनंद (दिल्ली), लातूर ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी साहेबराव नरवाडे,डॉ.सुधाकर गुळवे,बसवंत उबाळे,प्राचार्य डॉ.सुरेश वाघमारे, संजय सावंत,एम.एन.गायकवाड, आनंद नरंगलकर,मल्लिकार्जुन करडखेलकर,रघुनाथ बनसोडे,प्रा. यु.डी.गायकवाड,भिमराव चौदंते, डॉ.संजय गवई,बाबा कांबळे, सुशील चिकटे,विनोद खटके, आतिश चिकटे,कैलाश कांबळे, प्रा.प्रवीण कांबळे,डॉ.विजय अजनीकर,जि.एस.साबळे,पाडुरंग अंबुलगेकर,आर.एस.सोनकांबळे कांबळे,डॉ. दुष्यंत कटारे,प्रविण सूर्यवंशी,सचिन गायकवाड,कॅप्टन माधव कांबळे,सुधाकर कांबळे, विठ्ठल जाधव,संजय ओहळ, अन्तेश्वर थोटे,डॉ.अरुण कांबळे, सतिश कांबळे,विशाल वाहुळे, निलेश बनसोडे,आशा चिकटे, शोभा सोनकांबळे,सुजाता अजनीकर,विद्या ससाणे,कांचन अजनीकर,पंचशिला बनसोडे, शशिकला सुरवसे,कल्पना कांबळे, रेखा सुरवसे,निर्मला थोटे, शकुंतला नेत्रगांवकर,कविता कदम,सुनीता गायकवाड,निर्मला मधाळे,सरिता बनसोडे,भाग्यश्री सावंत आणि ममता गवई यांच्या सह हजारोंच्या संख्येने बौध्द उपासक उपासिका उपस्थित होते.
धम्मपरिषदेचे प्रास्ताविक केशव कांबळे यांनी केले आणि सूत्रसंचालन प्रा.देवदत्त सावंत यांनी केले. परिषदेच्या यशस्वीतेसाठी उदय सोनवने,विलास आवशंक, ज्योतीराम लामतुरे,अनिरुध्द बनसोडे,राजेश कदम,सतिश मस्के,करण ओव्हाळ, गौतम आदमाने, यशपाल मस्के,कुमार सोनकांबळे,समाधान मस्के, अविनाश आदमाने,मिलिंद धावारे यांच्यासह धम्मसेवक ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो