September 21, 2026

विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मातोळ्यात आदरांजली;शिक्षक-कर्मचाऱ्यांचा सहभाग

  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर आणि कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने,तसेच प्राचार्य व मुख्याध्यापक अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मातोळा ता.औसा जि.लातूर येथे दि. ६ डिसेंबर २०२५ रोजी विश्वरत्न, बोधीसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.
    कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य अजित साळवे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
    या प्रसंगी पर्यवेक्षक गंगाधर डबे, ज्येष्ठ शिक्षक राजेंद्र बडगीरे, शिक्षक राजकुमार शिनगारे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
    समता,स्वातंत्र्य आणि बंधुतेचा संदेश देणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला यावेळी सर्वांनी कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.
error: Content is protected !!