September 13, 2026

अनिल मोहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त मातोळा विद्यालयात विविध स्पर्धा

  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे अध्यक्ष व मार्गदर्शक अनिल (बापू) मोहेकर यांच्या वाढदिवसानिमित्त,संस्थेचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मातोळा येथे विविध स्पर्धा घेण्यात आल्या.
    या स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक संजय (बप्पा) भोसले यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.
    कार्यक्रमाला शालेय समितीचे अध्यक्ष डि.टी.(नाना) भोसले, सरपंच गोविंद विनायकराव भोसले,प्राचार्य अजित साळवे, पर्यवेक्षक डबे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!