March 26, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विद्याभवन हायस्कूलात अभिवादन

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल (बापू) मोहेकर व सचिव डॉ.अशोकराव (दादा) मोहेकर यांच्या प्रेरणेने तसेच मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले.
  • या प्रसंगी मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उपमुख्याध्यापक विक्रम मयाचारी,पर्यवेक्षक कोळी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
    ज्ञानाचा दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या शिक्षण महर्षींच्या कार्याला नम्र अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
error: Content is protected !!