लातूर – समृद्धी महामार्गासाठी अखंड परिश्रम घेतलेल्या, गोरगरीबांचे आधारस्तंभ आणि लातूर जिल्ह्याचे अभिमान असलेल्या इंजि.अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त युवा भीम सेनाचे संस्थापक अध्यक्ष पंकज भाऊ काटे यांच्या पुढाकाराने मातोश्री वृद्धाश्रमात स्नेहभोजन आयोजित करण्यात आले. या वेळी वृद्धाश्रमातील आजी-आजोबांच्या सानिध्यात वाढदिवस साजरा करताना भावनिक वातावरण निर्माण झाले. आपुलकीच्या स्पर्शाची उब देत पंकज भाऊ काटे म्हणाले, “वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांना जेवण,औषध,पाणी मिळते;पण मायेचा ओलावा नसतो.मला तुमचा मुलगा समजा.” कार्यक्रमादरम्यान आश्रमाचे चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच युवा भीम सेनेचे प्रवक्ते सुफी सय्यद शमशोद्दीन म्हणाले,ज्या लेकरांसाठी आई-वडिलांनी आयुष्य अर्पण केले,त्याच लेकरांनी शेवटी आपल्या जन्मदात्यांना नकोसं वाटावं,ही समाजातील सर्वात मोठी शोकांतिका आहे. कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी इंजि. अनिल गायकवाड यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो,अशी प्रार्थना केली. या प्रसंगी युवा भीम सेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,त्यात प्रदेशाध्यक्ष कुमार कांबळे,संपर्कप्रमुख आश्रुबा कांबळे,उपाध्यक्ष महेबुब सय्यद, जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे,महिला जिल्हाध्यक्षा उमाताई आदमाने, विद्यार्थी आघाडी शहराध्यक्ष गणेश पोटभरे,उपाध्यक्ष रोहन रायभोळे, सुनिल मस्के,काका सोणवणे, सविता निकम आदींचा समावेश होता. या उपक्रमाने वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवला आणि समाजात सेवाभाव हीच खरी श्रद्धांजली असा संदेश दिला.
More Stories
त्याग,समर्पण आणि प्रेरणेचा जागर;माता रमाई जयंती उत्साहात साजरी
आई-वडिलांमुळेच आपल्या अस्तित्वाची ओळख –डॉ.सुनील गायकवाड
खरोसा लेणी येथे माघ पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा;६५ धम्म अनुयायांचा सहभाग