धाराशिव (जिमाका) – महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, मुंबई यांच्या माध्यमातून सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विशेष घटक योजना तसेच बीजभांडवल योजना या दोन महत्त्वपूर्ण योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
🔹 १) विशेष घटक योजना : या योजनेअंतर्गत चालू वर्षासाठी ५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. प्रकल्प मर्यादा ₹५०,००० असून, त्यातील ५० टक्के रक्कम अनुदान म्हणून महामंडळ देणार आहे, तर उर्वरित ५० टक्के बँकेकडून कर्ज स्वरूपात मिळणार आहे. कर्जावर बँकेच्या नियमांनुसार व्याज आकारले जाईल व परतफेड ३ वर्षांच्या कालावधीत करायची आहे. (उदा. – ₹२५,००० अनुदान व ₹२५,००० बँक कर्ज)
🔹 २) बीजभांडवल योजना : या योजनेसाठीही ५ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रकल्प मर्यादा ₹५ लाखांपर्यंत असून, त्यातील २० टक्के रक्कम महामंडळाकडून बीजभांडवल कर्ज स्वरूपात ४% वार्षिक व्याजदराने दिली जाईल. या रकमेतील ₹५०,००० अनुदान म्हणून मिळतील. प्रकल्पाच्या ७५ टक्के रकमेचे बँक कर्ज मिळणार असून, अर्जदाराकडून ५ टक्के स्वःताचा सहभाग आवश्यक आहे. संपूर्ण कर्जाची परतफेड ३ ते ५ वर्षांच्या कालावधीत समान मासिक हप्त्यांद्वारे करावी लागेल. इच्छुक लाभार्थ्यांनी mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्जदारांनी स्वतःच्या ई-मेल अकाऊंटद्वारे अर्ज भरून त्याची प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे जिल्हा कार्यालयात स्वतः सादर करावीत. त्रयस्थ व्यक्तीकडून आलेले अर्ज अथवा कागदपत्रे स्वीकारले जाणार नाहीत, याची विशेष नोंद घ्यावी. यासाठी संपर्कासाठी जिल्हा व्यवस्थापक,महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला,धाराशिव येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या योजनांमुळे मागासवर्गीय समाजातील उद्योजक व युवकांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
More Stories
कळंबचा मान उंचावला!पूजा शिंदे महिला-बालकल्याण सभापती;शिवसेनेकडून भव्य सत्कार
जिल्ह्यातील एकही कुटुंब महिला बचत गटापासून वंचित राहू नये – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार
धाराशिव जिल्हा परिषदेत ‘सरप्राईज’ निकाल;कळंब तालुक्याची लॉटरी – दोन सभापती पदांवर झेंडा!