March 25, 2026

‘दखल’ दिवाळी अंकाचे प्रकाशन लातूरमध्ये हरिती वाचक चळवळीचे राहुल लोंढे यांच्या हस्ते संपन्न

  • लातूर – या वर्षीच्या ‘दखल’ दिवाळी अंकाचे प्रकाशन लातूर येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर दि.१४ ऑक्टोबर २०२५ रोजी हरिती वाचक चळवळीचे प्रमुख राहुल लोंढे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.
    ‘मैत्री आणि मित्रत्व’ ही संकल्पना घेऊन दखलचा यंदाचा अंक प्रकाशित झाला असून,या विषयावर अमर हबीब,शाहू पाटोळे,ॲड.राज कुलकर्णी, अशोक शिंदे,बालाजी आडसूळ, ॲड.जयश्री तेरकर,मीरा शिंदे, गणेश शिंदे आणि अमर बारकुल यांच्या लेखांचा समावेश आहे.
    तसेच भागवत घेवारे आणि शेखर गिरी यांच्या गझलांसह भाग्यश्री वाघमारे,सुनीता गुंजाळ,भूमिपुत्र वाघ आणि चंदा कुटे यांच्या कवितांनी अंक अधिक समृद्ध केला आहे.
    चार रंगी आकर्षक मुखपृष्ठासह १०४ पानांचा हा दखल दिवाळी अंक केवळ ₹४० मध्ये सर्वत्र विक्रीसाठी उपलब्ध आहे.
error: Content is protected !!