उमरगा – काव्यांगण दीपोत्सव तथा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा दिनांक 12 ऑक्टोबर 2025 रोजी उमरगा येथे साहित्यिक आणि रसिकांच्या उपस्थितीत समाज विकास संस्था सभागृहात थाटात पार पडला. उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीणजी स्वामी यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी संमेलनाध्यक्ष डॉ. विजयकुमार कस्तुरे तसेच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभली. मंचाचे अध्यक्ष विकास राठोड यांनी प्रास्ताविक करताना संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. आमदार स्वामी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “काव्यांगण साहित्य मंचाने राज्यस्तरावर साहित्य,शिक्षण,सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करून नवोदित कवींना प्रेरणादायी व्यासपीठ दिले आहे.” या कार्यक्रमात राज्यस्तरीय साहित्यरत्न,आदर्श माता, काव्यरत्न,आदर्श शिक्षक,आदर्श शिक्षिका,उत्कृष्ट कादंबरी, हिरकणी,आदर्श समाजसेवक आदी पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.तसेच ५० निमंत्रित कवींना सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. दुपारच्या सत्रात राज्यभरातून आलेल्या धुळे,जळगाव,लातूर, धाराशिव,नागपूर,अमरावती, अकोला आदी जिल्ह्यांतील दीडशेहून अधिक कवींनी आपली काव्यरचना सादर करून रसिक मंत्रमुग्ध केले. व्यासपीठावर आमदार प्रवीण स्वामी,डॉ.विजयकुमार कस्तुरे, विकास राठोड,डॉ.संजय राठोड, ॲड.शुभदा पोतदार,सुवर्णा पवार, डी.व्ही.खरात,डॉ.बबन महामुनी, प्रा.दिलीप पवार,सुभाष सोनवणे, अंकुश पडधान आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रमोद उबाळे,वृंदा गंभीर,ज्योती लाभसेटवर,किशोर पांचाळ, रवीराज राठोड,अशोक चव्हाण, सोपान पवार,के.पी. बिराजदार यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. महादेव गपाट यांनी कौशल्यपूर्णरीत्या पार पाडली. समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ यांनी सभागृह मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.पुढील काळात काव्यांगणासाठी कायमस्वरूपी सभागृह उपलब्ध करून देण्याची हमीही त्यांनी दिली. हा राज्यस्तरीय काव्य व पुरस्कार सोहळा सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा आणि अभिमानाचा विषय ठरला आहे.
More Stories
शब्द नवे,अर्थ नवे! युवा कवींच्या काव्यदीप संमेलनाने उमरगा काव्यमय!
स्वयंसेवी संस्थांच्या आणि कार्यकर्त्यांच्या ऱ्हासाची कारणे.
बालसंरक्षणाची बांधिलकी दृढ— बहुजन हिताय वसतिगृहात मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न