कळंब – तालुक्यात ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिके तसेच काही गावांमध्ये घरात पाणी शिरून अन्नधान्यासह संसारोपयोगी वस्तूंचाही मोठा नुकसान झाला.या परिस्थितीवर दखल घेत गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जाफराबादकरांनी सामाजिक कार्यकर्ते प्रभू गाढे,ग्रामसेवक लोखंडे,प्रा.वायाळ आणि विठ्ठल नाखोड यांच्या सहकार्याने ४५ क्विंटल धान्य व संसारोपयोगी साहित्य पाठवून मदत केली होती. पुढील पावसामुळे पुनःनुकसान झाल्याने विठ्ठल माने व पत्रकार परमेश्वर पालकर यांनी भोकरदन येथील लोकजागर सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केशव पाटील जंजाळ यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर मंगळवारी सकाळी आठशे किट घेऊन कळंब तालुक्यात मदत पोहोचवण्यात आली. या किटमध्ये गहू, तांदूळ, डाळी, तेल,रवा,साखर,ताट,तांब्या, साडी, ब्लँकेट इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. हे किट एकूरगा, जवळा, पिंपळगाव (को), भोगजी, आडसूळवाडी, ईटकूर, गंभीरवाडी, बोरगाव (ध) या गावांमध्ये नुकसानग्रस्तांना वाटप करण्यात आले. वाटप कार्यात लोकजागर संस्थेचे अध्यक्ष केशव पाटील जंजाळ, जाफराबादचे सामाजिक कार्यकर्ते प्रभू गाढे,गजानन फड,सचिन तेलंगरे,आदित्य सोनी,गौरव कुदर, साहेबराव गावंडे,भागवत कानडजे,नारायण जाधव,रामदास गाढे,राजू भवर,फकीरबा उबाळे, अशोक इचचे,दगडूबा सुसर,हसन चाऊस,चाऊस अली,भगवान महाराज इचचे हे शेतकरी बांधव उपस्थित होते. हे किट गरजू पर्यंत पोहचवण्यासाठी राष्ट्रवादी उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे मराठवाडा अध्यक्ष परमेश्वर पालकर, अभयसिंह आडसुळ,शिवाजी पाटील,धनंजय घोगरे,रामेश्वर जाधवर,रोहित आडसुळ यांच्याही सहकार्याने मदत केली गेली. नुकसानग्रस्तांनी भोकरदन आणि जाफराबादकरांचे मनःपूर्वक आभार मानले.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव