March 26, 2026

पिंपळगावच्या कन्यांचा लौकिक राज्यभर;शाळेत उत्साहात सत्कार

  • पिंपळगाव डोळा – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पिंपळगाव डोळा ता.कळंब येथे अनुजा दशवंत व ऐश्वर्या दशवंत या दोन गुणी विद्यार्थिनींचा भव्य सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
    समारंभाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कालिदास दत्त हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. स्वामीताई,उपसरपंच उमेश धस, सौ.धसताई,तसेच संतोष मोहिते व गुलचंद कदम उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक गंभीरे यांनी केले. सुरुवातीला शाळेतील विद्यार्थिनी उत्कर्षा जगताप,अंकिता जगताप, वैभवी दत्त व वेदिका आडसूळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
    एमबीबीएससारख्या कठीण प्रवेश परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल अनुजा दशवंत हिचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तर राज्यस्तरीय एनएसएसई परीक्षेत दहावा क्रमांक पटकावल्याबद्दल ऐश्वर्या दशवंत हिचाही सन्मान करण्यात आला.
    प्रास्ताविक करताना नवनाथ तुंदारे यांनी विद्यार्थिनींच्या यशाबद्दल गौरवोद्गार काढले.ते म्हणाले, “आज इंग्रजी व मराठी शाळांमधील फरक पालकांसमोर स्पष्ट झाला आहे. मराठी शाळांत शिकलेले विद्यार्थी यूपीएससी, एमपीएससीसारख्या कठीण स्पर्धा परीक्षेत यश संपादन करतात.” त्यांनी शाळेतील भौतिक सुविधा, ई-लर्निंगद्वारे अध्यापन, शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, उत्कृष्ट शालेय पोषण आहार, खेळांचे प्रात्यक्षिक व सांस्कृतिक उपक्रम यांची माहिती उपस्थितांना दिली.
    प्रमुख पाहुण्यांनीही अनुजा व ऐश्वर्या या दोन्ही विद्यार्थिनींचे कौतुक केले.त्यांनी पालकांना मराठी शाळेचे महत्त्व अधोरेखित केले.
    श्रीमती सुरेखा भाहुले यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामढवे सर,कोरे मॅडम व रहीम शेख यांनी विशेष परिश्रम घेतले.
error: Content is protected !!