मयताच्या कुटुंबियाची जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी घेतली भेट
धाराशिव (जिमाका) – परंडा तालुक्यातील मौजे हिंगणगाव (खुर्द) येथील विलास अंबादास गायकवाड (वय ५०) हे दि.२१ सप्टेंबर रोजी नळी नदीच्या पुराच्या पाण्यात वाहून गेले होते.त्यांचा मृतदेह २५ सप्टेंबर रोजी सापडला. पोलिसांनी पंचनामा करून अंत्यविधी करण्यात आला. या घटनेनंतर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी २७ सप्टेंबर रोजी मयताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला.तसेच तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांना तात्काळ मदतकार्य करण्याचे निर्देश दिले.तसेच यावेळी जिल्हाधिकारी श्री.पुजार यांनी परंडा तालुक्यातील नुकसानग्रस्त गावांची पाहणी केली व ग्रामस्थांशी संवाद साधला.
More Stories
सख्ख्या भावांची कमाल! महाराष्ट्र केसरी 2026 मध्ये रा.गे.शिंदे महाविद्यालयाचा झेंडा उंचावला
जिल्हा परिषद सदस्य दयानंद ढाले यांचा क्रांती अकॅडमीकडून जंगी सत्कार;विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी संदेश
रोजगार मेळावा विद्यार्थ्यांसाठी नवी संधी,नवी स्वप्ने आणि उज्ज्वल भविष्य घडवणारा – डॉ. सतीश कदम