मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ. अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.१८ सप्टेंबर २०२५,गुरुवार रोजी ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या पूजनाचा मान प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांच्या हस्ते पार पडला.यावेळी प्रशालेतील चिलवंत राजाभाऊ,श्रीमती उषा पांचाळ,धनंजय परजणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यालयात श्रद्धा व प्रेरणेचे वातावरण निर्माण झाले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन