मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा येथील प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर यांचा वाढदिवसानिमित्त दि.१७ सप्टेंबर रोजी ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शाल–पुष्पहाराने सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे आयोजन सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.यावेळी प्राचार्य मोरे यांनी रमेशभाऊंना उत्तम आरोग्य व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.आपले मनोगत व्यक्त करताना रमेशभाऊ मोहेकर म्हणाले, “सहकाऱ्यांचे प्रेम पाहून मी अजून तरुण झालो आहे. सर्वांचे मनःपूर्वक आभार.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक सतीश मडके यांनी केले,तर सतीश कानगुडे,प्रा.सुनील साबळे,प्रा.देवदत्त पाटील,प्रा. अमित जाधव,प्रा.दिग्विजय पाटील,प्रा.राहुल भिसे आदींसह शिक्षक–कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन