पुणे (अशोक आदमाने)– काव्यमित्र संस्था,पुणे तर्फे सामाजिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत दरवर्षी प्रदान केला जाणारा “डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम सेवा पुरस्कार” यावर्षी सुप्रसिद्ध समाजसेवक, गीतकार,चित्रपट निर्माते,लेखक, दिग्दर्शक,साहित्यिक तसेच एकपात्री नाटककार शिवश्री भूमिपुत्र वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे. या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आले असून,यावेळी भूमिपुत्र वाघ यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यास मातृतीर्थ शिंदखेडा राजा येथील लखोजी जाधवराव यांचे चौदावे वंशज संभाजीराजे जाधवराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच भोसरी येथील उद्योजक संतोष शहा हे प्रमुख अतिथी म्हणून लाभणार आहेत. महाराष्ट्रभरातील अनेक काव्यरसिक व साहित्यिकांचा या कार्यक्रमास मोठ्या संख्येने सहभाग अपेक्षित असून, या सर्वांच्या साक्षीने भूमिपुत्र वाघ यांना मानाचा डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेवा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक व संयोजक राजेंद्र सगर (पुणे) यांनी दिली.
More Stories
गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला पुण्यात कर्तृत्ववान महिलांचा भव्य गौरव सोहळा
शरद सावंत यांना “मराठवाडा ग्लोबल उद्योजक” पुरस्कार प्रदान
पुण्यात राज्यस्तरीय महिला असेंब्ली उत्साहात;न्याय व संविधानिक हक्कांसाठी कृती आराखडा जाहीर