- कळंब – कळंब येथील पियुष बालाजी बाहेती या तरूणाने १९ व्या वर्षात फोटो काढण्याचा जागतिक विक्रम करत केल्याने त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.त्यांच्या या यशाबद्दल पियुष याच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कळंब जि.धाराशिव येथील पुजा डिजिटल फोटो स्टुडिओचे संचालक बालाजी बाहेती यांचा मुलगा पियुष बालाजी बाहेती हा १९ वर्षे वयाचा तरूण सध्या पुणे येथे डीवाय पाटील इंजिनिअर काॅलेजमध्ये इंजिनिअरींगचे शिक्षण घेत आहे.पियुष यास लहानपणापासुनच फोटो काढण्याची आवड असल्याने तो सतत कुठे ना कुठे कॅमेर्यात फोटो काढत असतो.पियुषने अनेक सुंदर व मनमोहन क्षण आपल्या कॅमेर्यात टिपले.त्याच्या अंगी असलेल्या फोटो कलेचे सतत अनेकांकडून कौतुक होत असे.त्याची हीच आवड,छंद त्याला उंच शिखरावर नेईल असे त्याला व त्यांच्या कुटुंबास कधी वाटले नव्हते.पियुष बाहेती याने खास मांडलेल्या सेटअपमध्ये आपल्या कॅमेर्यात केवळ ६० सेकंदात तब्बल २६२ फोटो काढुन नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला होता.त्याच्या या जागतिक विक्रमाची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने घेऊन, त्याचे नाव आपल्या गौरवशाली विक्रमांच्या यादीत नोंदवले.ही वार्ता पियुष व त्याच्या कुटुंबीयांना समजताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.कळंब सारख्या ग्रामीण भागातील एक नवतरुणाने आपल्या बुध्दीच्या,कलेच्या माध्यमातून असा जागतिक विक्रम करून, त्याने आपले स्वतःचे,कुटुंबाचे व गावचे नाव जागतिक पातळीवर गाजवत नावलौकिक मिळवला.याबद्दल पियुष याचे कळंब तालुक्यासह धाराशिव जिल्ह्य़ात सर्वत्र कौतुक होत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. याप्रसंगी त्याचे कळंब धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांनी सत्कार करून अभिनंदन केले आहे.कुटुंबाच्या पाठबळावरच मी हा जागतिक विक्रम शक्य करू शकलो – पियुष बाहेती
आपला आनंद व्यक्त केल्यानंतर पियुष बाहेती म्हणाला की,वडिल बालाजी बाहेती व चुलते सतीशचंद्र बाहेती हे फोटोग्राफी क्षेत्रात असल्याने मला लहानपणापासूनच फोटो काढण्याची आवड व छंद लागला.हाच छंद मी सतत जोपासत असुन, मी केवळ ६० सेकंदात तब्बल २६२ फोटो काढले.तेव्हा मला वाटले नव्हते.की माझा हाच छंद जागतिक विक्रम ठरेल.जेव्हा ती बातमी ऐकली तेव्हा मला प्रथम विश्वासच बसत नव्हता मात्र ते सत्य होते.हा जागतिक विक्रम मी माझ्या कुटुंबाचा पाठबळावर व माझ्या मेहनतीने आणि आईवडिलांच्या आशिर्वादाने केला.याचा मला मनस्वी आनंद होत असुन, हा अभिमान आपल्या सर्वांचा असल्याची प्रतिक्रिया पियुष बाहेती याने व्यक्त केली.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड