कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य हेमंत भगवान यांच्या मार्गदर्शनाखाली कळंब शहरातील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात शारीरिक शिक्षण विभाग,क्रीडा विभाग आणि राष्ट्र सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २९ ऑगस्ट २०२५ रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या १२० व्या जयंतीनिमित्त दरवर्षी हा दिवस साजरा केला गेला.कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉ.हेमंत भगवान व संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी क्रीडा विभागप्रमुख डॉ. बोन्दर,डॉ.अभिजित मोहेकर, प्रा.सुरज गपाट प्रा.वायबसे तसेच शिक्षकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा.सुरज गपाट यांनी आपल्या भाषणात मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरी सांगून खेळामुळे शिस्त,आत्मविश्वास व संघभावना विकसित होते असा संदेश दिला.यावेळी उपप्राचार्य के. डी.जाधव,प्रा.डॉ.सूर्यवंशी,डॉ. राठोड ,डॉ.गुंडरे,डॉ.चिंते , डॉ.मस्के,डॉ.महाजन,डॉ. चंदनशिवे,प्रा.वाळके, प्रा. बुधवंत, प्रा.माने,प्रा.भोसले,डॉ.पावडे , डॉ.साठे.प्रा.शेख.कार्यालयीन अधीक्षक हनुमंत जाधव,अमोल सुरवसे तसेच इतर शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रोसे यो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.ताटीपामुल ,प्रा.डॉ.चांदोरे ,प्रा.अंकुशराव यांनी परिश्रम घेतले.
More Stories
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
हुंडा प्रतिबंध व कौटुंबिक हिंसाचार जनजागृती काळाची गरज- ॲड.प्रियंका जाधव