February 8, 2026

“पुण्यात गाजला परंडा-धाराशिवचा साहित्य डंका”

  • पुणे – अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित चौथे राज्यस्तरीय राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन २०२५ दि. १९ ऑगस्ट २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन,वानवडी, पुणे येथे उत्साहात संपन्न झाले.
    या संमेलनाचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक सूर्यकांत नामुगडे होते. स्वागताध्यक्ष पै.राहूलभाऊ काळभोर (महाराष्ट्र केसरी), उद्घाटक किशोर टिळेकर,विशेष अतिथी श्रीमती शुभांगीताई काळभोर (राष्ट्रीय उपाध्यक्षा, परिषद) यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.तसेच श्रीमंत युवराज संभाजीराजे भोसले यांची उपस्थिती अपेक्षित असली तरी अतिवृष्टीमुळे त्यांच्यासह अनेक मान्यवर साहित्यिक अनुपस्थित राहिले.
    धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील जेष्ठ साहित्यिक गडंगणकार यांनी मराठवाडा उपाध्यक्ष या नात्यानेच नव्हे तर संमेलनाच्या पहिल्या सत्राचे अध्यक्ष म्हणूनही प्रभावी ठसा उमटविला.परंडा तालुका अध्यक्ष शिवशाहीर शरद नवले यांनी त्यांच्या पहाडी आवाजातील शिवशाहीरीने पुणेकरांना मंत्रमुग्ध केले.
    या योगदानामुळे परंडा व धाराशिवचा साहित्य डंका पुण्यातील या भव्य संमेलनात दणदणीतपणे वाजला.परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी विशेष उल्लेख करून “धाराशिवचे साहित्यिक परंपरेत अपूर्व योगदान देत आहेत” असे गौरवोद्गार काढले.
error: Content is protected !!