लातूर – शहरातील श्री बसवेश्वर महाविद्यालयात नुकतीच जिल्हास्तरीय सब-ज्युनियर ज्युदो कुस्ती निवड चाचणी पार पडली. या निवड चाचणीतून १४ वर्षाखालील वयोगटातील ३५ किलो वजनी गटातून प्रिन्स विलास सोनवणे याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विशेष म्हणजे प्रिन्सची ही निवड सलग दुसऱ्यांदा झाली आहे. प्रिन्सने आपली जिगरबाज वृत्ती, मेहनत व जिद्द याच्या जोरावर हे यश मिळवले आहे.त्याला सुरेंद्र कराड,आशिष क्षीरसागर,संपत साळुंखे,चेतन जावळे,शिवराज हाके तसेच शाळेतील प्रशिक्षक मुकेश बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले.प्रिन्स हा स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी आहे,अशी माहिती त्याचे आई-वडील प्रिया व विलास सोनवणे यांनी दिली. दरम्यान,राज्यस्तरीय सब-ज्युदो चॅम्पियनशिप स्पर्धा प्रथमच याच महिन्यात लातूरमध्येच पार पडणार आहे. त्यामुळे लातूरचे प्रतिनिधित्व करताना प्रिन्स सोनवणे जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण ठरणार आहे. प्रिन्सच्या या यशाबद्दल जेएसपीएम शिक्षण संस्थेचे संचालक अजीत पाटील कव्हेकर, विष्णू सोनवणे,मानसी सोनवणे, विलास घारगावकर,प्राचार्य गोविंद शिंदे,प्राचार्य डॉ.संजय गवई, मधुकर सोनवणे,प्रा.डॉ.लहू वाघमारे,प्रा.बापू गायकवाड,डॉ. विजय अजनीकर,सुजाता अजनीकर,ॲड.सचिन कांबळे, सुशीलकुमार चिकटे,आशाताई चिकटे,बसवंतप्पा उबाळे,शेप सर, मुख्याध्यापक एस.एन.गायकवाड यांसह अनेकांनी प्रिन्सचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
More Stories
अटल टिंकरिंग लॅब प्रकल्प प्रदर्शनात जिजामाता विद्यालयाची चमकदार कामगिरी; जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांक
सामाजिक कार्यासाठी सुफी सय्यद शमशोद्दीन यांना ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरव
“बौद्ध धम्म हा समतेचा मार्ग” – भिक्खू पय्यानंद थेरो