February 8, 2026

सा.साक्षी पावनज्योतचा नववा वर्धापन विशेषांक प्रकाशन उत्साहात संपन्न

  • स्वातंत्र्यदिनाच्या सुवर्णक्षणी जनतेच्या उपस्थितीत सोहळा उजळला

  • कळंब – बहुजनांच्या न्याय हक्कासाठी आणि शिक्षणमहर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या वृत्तपत्रातील स्वप्नपूर्तीसाठी प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योत चा नवव्या वर्धापन दिनानिमित्त,दि.१५ ऑगस्ट २०२५ या स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने वर्धापन विशेषांकाचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.
    नगरपालिका परिसरातील ध्वजारोहण सोहळ्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव पांडुरंग कुंभार,नगर परिषद मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
    याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण वाघमारे,भाजप नेते नागजी घुले,मुख्य संपादक सुभाष घोडके,ह.भ.प महादेव आडसुळ महाराज,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेश पारख,उपसंपादक माधवसिंग राजपूत,गुणवंत कामगार संघटनेचे अच्युत माने,कार्यकारी संपादक अविनाश घोडके,तालुक्यातील स्वातंत्र्यसैनिक,ज्येष्ठ नागरिक,नगर परिषदेतील कर्मचारी आणि शेकडो नागरिक उपस्थित होते.
    बाजार समितीच्या आवारातही विशेषांकाचे प्रकाशन
  • शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयासमोरील मैदानात विशेषांकाचे प्रकाशन समितीचे सचिव दत्तात्रय वाघ यांच्या हस्ते झाले.
    या प्रसंगी बाजार समितीतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.विशेषांकाची प्रत हातात घेताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर अभिमान आणि आनंदाचे तेज झळकत होते.
  • कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल – 
  • शहरातील कॅनव्हास इंटरनॅशनल स्कूल येथे सा.साक्षी पावनज्योत वर्धापनदिन विशेषांक प्रकाशन कार्यक्रमाने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
    याप्रसंगी शिक्षण विस्तार अधिकारी सुशील फुलारी,संस्थापक अध्यक्ष रवी नरहिरे,ज्येष्ठ व्याख्याते महादेव खराटे,प्रकाश ऑफसेटचे मालक सतीश खिवंसरा,कार्यकारी संपादक अविनाश घोडके यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते,कवायती सादर करून स्वातंत्र्याचा आणि वर्धापन दिनाचा गौरव गगनात पोहोचवला.
  • गेल्या नऊ वर्षांपासून सा.साक्षी पावनज्योत ग्रामीण भागातील सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रवाहाला नवे वळण देत आहे.
    ही केवळ कागदावर छापलेली अक्षरे नाहीत,तर ती आहेत. जनतेच्या वेदनांचा आवाज,हक्कांसाठीची लढाई आणि ज्ञानप्रदीपाचा प्रकाश.
    या वर्धापन सोहळ्यात वाचक,सहकारी,मान्यवर आणि समर्थक यांच्या उपस्थितीने पुन्हा एकदा सिद्ध झाले की,
    “साक्षी पावनज्योत” ही फक्त पत्रिका नसून,ती एक जिवंत चळवळ आहे.
error: Content is protected !!