येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा संचलित ज्ञानोद्योग विद्यालयात दि.१२ ऑगस्ट २०२५ रोजी कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी व सरस्वती पूजन तसेच दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल होते,तर प्रमुख उपस्थितीमध्ये सचिव डॉ.अशोकराव मोहेकर, SBI येरमाळा शाखेचे प्रतिनिधी अजय कारवा,शा.स. शअध्यक्ष भाऊसाहेब (अप्पा) बारकुल, कोषाध्यक्ष अंकुश पाटील आणि प्रमुख वक्ते प्रा.विशाल गरड हे होते. सत्कारमूर्ती म्हणून नामांकित उद्योजक रमेश (काका) जाधवर आणि SBI येरमाळा शाखेचे फिल्ड ऑफिसर अजय कारवा यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. रमेश जाधवर यांनी विद्यालयास आरोह वॉटर फिल्टर व पाणी टाकी भेट दिली.त्यांनी पत्नीच्या स्मृतीप्रित्यर्थ ही भेट दिल्याचे सांगताना भावनिक क्षण रंगले. तसेच शाळेतून दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास ₹५१०० चे बक्षीस आणि येरमाळा गावात जन्मलेल्या प्रत्येक मुलीसाठी ₹५००० चा धनादेश देण्याची घोषणा केली. अजय कारवा यांनी विद्यालयास ५ किलोवॅट क्षमतेच्या सोलर पॅनेलची भेट दिली. प्रमुख वक्ते प्रा.विशाल गरड यांनी ग्रामीण भाषेतील विनोदबुद्धी आणि चातुर्याने विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला. “शिक्षण हे वाघीनीचे दूध आहे; ते पिल्यास मन,मनगट आणि मेंदू बलवान होतात”. डॉ.अशोकराव मोहेकर यांनी नवीन शैक्षणिक धोरणावर सखोल मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात प्रा.आबासाहेब बारकुल यांनी सत्कारमूर्तींच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करून कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल शिंदे यांनी केले,तर आभार प्रदर्शन संदीप पेजगुडे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
More Stories
ज्ञानोद्योग विद्यालयात ‘स्वयंशासन दिन’ उत्साहात साजरा!
स्त्री शिक्षणाच्या जननींना अभिवादन;ज्ञानोद्योग विद्यालयात जयंतीनिमित्त सांस्कृतिक उपक्रम संपन्न
येरमाळ्यात लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांची जयंती सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरी