August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.23 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 94 कारवाया करुन 63,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)भास्कर रघुनाथ कदम, वय 58 वर्षे, रा. कानेगाव ता. लोहारा, जि. धाराशिव हे दि.23.11.2023 रोजी 12.50 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 960 ₹ किंमतीची देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • भुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.23.11.2023 रोजी 13.30 ते 13.40 वा. सु. भुम पो. ठा. 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)मच्छिंद्र शामराव पवार, वय 32 वर्षे, रा. कल्याण नगर, ता. भुम जि. धाराशिव हे 13.30 आठवडी बाजार भुम येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 200 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)सागर अंकुश पवार, वय 25 वर्षे, रा. इंदीरानगर, ता. भुम जि. धाराशिव हे 13.40 आठवडी बाजार भुम येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 220 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये भुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
    उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.23.11.2023 रोजी 14.15 ते 15.10 वा. सु. उमरगा पो. ठा. 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)गोविंद तुळशिराम जाधव, वय 55 वर्षे, 2) शिवलिंग सिदराम बनसोडे, वय 26 वर्षे, 3) रतन हनुमंत एकुरगे, वय 49 वर्षे, 4) सुनिल सुधाकर पाटील, वय 48 वर्षे, सर्व रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.10 लक्ष्मी मंदीर परिसरात कदेर येथे तिन पत्ते जुगाराचे साहित्यासह एकुण 26,990 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. तर 2)सुधाकर नरसाप्पा शिंदे, वय 63 वर्षे, रा. नागोरा, ता. जि. धाराशिव हे 14.15 उमरगा बसस्थानक जवळ याटे कॉम्प्लेक्स येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,920 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • मुरुम पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान मुरुम पोलीसांनी दि.23.11.2023 रोजी 15.30 वा. सु. मुरुम पो. ठा. आष्टाकासार येथील बसस्थानक जवळ छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)प्रमोद नागाप्पा सोलापुरे, वय 55 वर्षे, रा आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव हे 15.30 आष्टाकासार येथील बसस्थानक जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 480 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सतिश तुकाराम भालकाटे, वय 39 वर्षे, रा. मुरुम, जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 11.00 वा. सु. आपल्या ताब्यातील वाहन क्र एमएच 25 ई 9693 हे मुरुम ते अक्कलकोट रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. तसेच 2)युनुस हुसेन सय्यद, वय 21 वर्षे, रा. बोरी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एन 0506 हा बसस्थानक समोर मुरुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. 3)खासीम फतरु जमादार, वय 51 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 12.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एन 4354 हा कन्या शाळे समोर मुरुम येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. 4)रमेश लक्ष्मण राठोड, वय 30 वर्षे, रा. नाईकनगर सु, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 16.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 25 एन 236 हा मुरुम मोड ते मुरुम रस्त्यावर नाईकनगर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. तसेच 5)तुकाराम ज्ञानेश्वर साखरे, वय 25 वर्षे, रा. सुंदरवाडी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 17.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एन 438 हा नाईकनगर मुरुम येथे रस्त्यावर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना मुरुम पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये मुरुम पो.ठा. येथे स्वतंत्र 5 गुन्हे नोंदवले आहेत.
  • बेंबळी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)किशोर शिवाजी कोळगे, वय 28 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 13.05 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25 आर 1461 हा रुईभर पाटी चौकात सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आला. तसेच 2)सचिन साहेबराव लोमटे, वय 35 वर्षे, रा. रुईभर ता. जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 14.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा क्र एमएच 13 एझेड 0785 हा रुईभर पाटी चौक येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना बेंबळी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये बेंबळी पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
    लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1)सरदार फकिर, वय 42 वर्षे, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 17.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एम 0542 हा छत्रपती शिवाजी महाराज चौक लोहारा येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. तसेच 2)बालाजी हरिदास स्वामी, वय 37 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 14.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपेरिक्षा हा सास्तुर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. 3)आलीम गफुर शेख, वय 35 वर्षे, रा. बलसुर ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.23.11.2023 रोजी 14.30 वा. सु. आपल्या ताब्यातील ॲपे रिक्षा क्र एमएच 25 एन 848 हा बलसुर येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना लोहारा पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.स. कलम 283 अन्वये लोहारा पो.ठा. येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) शाम तुकाराम कुंभार, वय 32 वर्षे, रा. सरकारी दवाखाना जवळ होडगी ता.द. सोलापूर हे दि.23.11.2023 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 13 सीटी 2674 हा तामलवाडी टोलनाका येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : धाराशिव शहर पो.ठा. चे पथक दि. 23.11.2023 रोजी 19.00 वा.सु. धाराशिव शहरात गस्तीस असताना शहरातील वन विभाग कार्यालयाच्या पाठीमागे तुळजापूर रोड धाराशिव येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एक इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपले नाव- 1) अक्षय उर्फ अखिल्या मारुती उर्फ मारतुल्या शिंदे, वय 25 वर्षे, रा. शिवाजी चौक बॅक कॉलनी निलंगा ता. निलंगा जि. लातुर असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यानी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे : धाराशिव शहर पो.ठा. चे पथक दि. 23.11.2023 रोजी 20.10 वा.सु. धाराशिव शहरात गस्तीस असताना शहरातील आयुर्वेदीक कॉलेजच्या पाठीमागे धाराशिव येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या दोन इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपले नाव- 1) एरिअल मारुती उर्फ मारतुल्या शिंदे, वय 27 वर्षे, रा. शिवाजी चौक बॅक कॉलनी निलंगा ता. निलंगा जि. लातुर 2) कार्तीक रिशु भोसले, वय 31 वर्षे रा. बायपास रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- शरद उध्दवराव पवार, वय 43 वर्षे, रा. शिवाजीनगर बाळे सोलापूर, ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांचे सीएनएच इंडस्ट्रीयल इंडीया लिमीटेड कंपनीचे केस 4000 सिरीज लाल व काळ्या रंगाचे उसतोडणी हार्वीस्टर चेसी नं PNEY4000EJ2MA0364 व इंजिन नं 81K84826208 असे असलेले किंमत अंदाजे 14,00,000₹ किंमतीचे दि.18.10.2023 रोजी 22.00 ते दि. 19.10.2023 रोजी 09.00 वा. सु. शिंगोली येथील संभाजी नगर हायवे रोडचे रायगड धाब्याचे बाजूस धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद पवार यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)संजय जगन्नाथ शिरगिरे, 2)जगन्नाथ रानबा शिरगिरे,3)मंगल जगन्नाथ शिरगिरे, सर्व रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 10.15 वा. सु. गोंधळवाडी शिवारातील शेत गट नं. 246 मध्ये फिर्यादी नामे- अंकुश शिवाजी शिरगिरे, वय 42 वर्षे, रा. गोंधळवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेती रोटर करण्याच्या कारणावरुन फिर्यादीस फिर्यादी व फिर्यादीचा मुलगा व पत्नी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण करुन जखमी केले. तसेच नमुद आरोपींनी फिर्यादीचे नातेवाईक दत्तात्रय गणपत मोटे, शंकर गणपत मोटे हे भांडण सोडवत असताना यांचे पाटीवर सत्तुरने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अंकुश शिरगिरे यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)चंदुलाल उर्फ पप्पु शेख रा. बारुळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.22.11.2023 रोजी 18.30 वा. सु. बारुळ येथे फिर्यादी नामे- मज्जिद महेबुब बेग, वय 42 वर्षे, रा. मेंढा ता. ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने कौटुंबिक वादाचे कारणावरुन फिर्यादी व त्याच्या चुलत भाउ यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. फिर्यादीच्या मुलीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- मज्जिद बेग यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)अमोल शंकर लोंढे, 2) दत्ता शंकर लोंढे, 3) पार्वती शंकर लोंढे, 4) शंकर लिंबराज लोंढे, 5) नाना हरीराम काकडे, 6) अश्विनी अमोल लोंढे सर्व रा. नितळी ता. जि. धाराशिव यांनी दि.21.11.2023 रोजी 07.00 वा. सु. नितळी शिवार येथील सामाईक बांधावर फिर्यादी नामे-रामेश्वर श्रीमंत भोसले, वय 42 वर्षे, रा. नितळी, ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने भांडण सोडवण्याचे कारणावरुन फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, सळईने व काठीने मारहान केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रामेश्वर भोसले यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 143, 147, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1) नागेश विकास मडके, रा. तुळजापूर नाका मांगडे चाळ बार्शी ह.मु. वडगाव सि. आश्रम शळेजवळ, 2) उमेश वामनराव मटकटे रा. फुलसुर ता. फुलसुर जि बीदर कर्नाटक, 3) लैला उत्तम थोरात रा. सौंदरे ता. बार्शी ह.मु. साई हॉटेल वडगाव सि. ता. जि. धाराशिव यांनी दि. 22.11.2023 रोजी 13.45 वा. सु. बावी पाटी जवळ शेत गट नं 52 मध्ये फिर्यादी नामे- बालाजी जनक कुंभार, वय 49 वर्षे, रा. तांबरी विभाग धाराशिव ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींने धाबा चालवण्यास देण्याचे कारणावरुन दहा लाख रुपये खंडणी द्या असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विटाने व सळईने मारहान करुन करंगळी फॅक्चर केली. तसेच बालाजी विठ्ठल कुभांर हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी कुंभार यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 326, 384, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मुरुम पोलीस स्टेशन हद्दीत ग्राम सुरक्षा दल प्रभावीपणे सक्रिय.”
  • वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी व पेालीसांच्या अपुऱ्या मनुष्यबळामुळे मुरुम पोलीस स्टेशनचे वतीने लोक सहभागातुन पारंपारिक पध्दतीने रात्रीची गस्त घालण्यासाइी पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गावामध्ये ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली आहे. ग्रामसुरक्षा दलाच्या माध्यमातुन गावातील लोकांचे घरे, बॅका, एटीएम, सोनाराची दुकाने इत्यादी ठिकाणी गस्त घालून चोरीच्या घटनांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मुरुम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील काही दिवसांपासून ग्राम सुरक्षा दल संकल्पने नुसार रात्रीची गस्त सुरु झालेले असुन गावातील लोकांनी मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने ग्रामसुरक्षा दलामध्ये सहभाग नोदंवला असुन उत्स्फुर्तपणे रात्रीची गस्त करत आहे. तसेच मुरुम पोलीस स्टेशन मधील प्रत्येक अंमलदार यांना एक गाव दत्तक म्हणुन देण्यात आले आहे.सदर अंमलदार हे आपले कढील दत्तक गावामध्ये संबधित ग्राम सुरक्षा दल यांचेशी योग्य तो समन्वय साधून प्रभाविपणे रात्रगस्त राबवित आहे.
  • आज दि. 23.11.2023 रोजी येणेगुर दुरक्षेत्र येथे कोराळ, येणेगुर, कडदोरा, महालिंगरायावाडी, नळवाडी, भोसगा येथील ग्राम सुरक्षा दल सदस्यांना सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, सपोनि पवन इंगळे यांच्या हस्ते ओळख म्हणून ग्राम सुरक्ष दलाचे टी-शर्ट तसेच शिट्टी चे वाटप करण्यात आले. यावेळी माजी जि.प.सदस्य रफीक तांबोळी, पत्रकार शरद गायकवाड सहा गावचे पोलीस पाटील, येणेगुर पोलीस दुरक्षेत्राचे सफौ शिंदे पोलीस अंमलदार- मडोळे, व्हर्टे, मसाळ, उपस्थित होते. यावेळी सपोनि शेंडगे, सपोनि इंगळे यांनी मार्गदर्शन केले. मुरुम पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम सुरक्षा दल हे मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधिक्षक श्री. गौहर हसन यांचे आदेशावरुन मा.उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मच्छिंद्रनाथ शेंडगे, सपोनि पवन इंगळे, पोउपनि शिंदे, व मुरुम पोलीस स्टेशन चे अमंलदार हे ग्रामसुरक्षा दल संकल्पना यश्स्वी होण्यासाठी प्रयत्न करत आहे.
error: Content is protected !!