नांदेड (जिमाका) – संविधान दिनानिमित्त रविवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ८ वा.सामाजिक न्याय विभागातर्फे रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा ज्योतीबा फुले पुतळा येथून या रॅलीचा प्रारंभ होईल. ही रॅली शिवाजीनगर, कलामंदिर, मुथा चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत रॅली जाईल व येथेच संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचनाने रॅलीचा समारोप होईल. नांदेड जिल्हा प्रशासनातील सर्व विभागाचे प्रतिनिधी या रॅलीत सहभागी होणार आहेत. संविधानाच्या जागरासाठी नागरिकांनीही या रॅलीत सहभागी व्हावे असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे
More Stories
कळंबच्या डॉ.संपदा रणदिवे यांना बीएएमएस पदवी;नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान
विनोद कोल्हे राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्काराने सन्मान
भारतीय संविधानावर आघात; बुधवारी संत महंतासह मौनव्रत