August 8, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर अँग्रो इंडस्ट्रीज कारखान्याचे बॉयलर पेटले

  • मोहा – कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ऍग्रो इंडस्ट्रीज या कारखान्याचे दि.२४ सप्टें २०२३ रोजी बॉयलर पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
    याप्रसंगी चेअरमन हनुमंत मडके यांनी कारखाना ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये गाळप चालू करायचे असून सभासदांच्या ऊसाला चांगला भाव देण्याचा कारखान्याकडून प्रयत्न राहील असे बोलताना सांगितले.
    यावेळी ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोक मोहेकर,चेअरमन हनुमंत मडके,मोहेकर ऍग्रोचे कार्यकारी संचालक संतोष मडके,प्रशासकीय अधिकारी रमेश मोहेकर,अभिजित मोहेकर, गजानन समुद्रे, विविध का.सेवा स.सो. माजी चेअरमन अनंत दिगंबर मडके,मोहेकर ऍग्रो चे संचालक बापूराव शेळके,अक्षय बलाई, तेरणा कारखान्याचे माजी संचालक अच्युत मडके, उध्दव मडके,माजी सरपंच बाबासाहेब मडके,संजय मडके, ह.भ.प भारत जोशी,धनंजय मडके,प्रमोद मडके तसेच शेतकरी सभासद,ऊस ठेकेदार,ऊस वाहन धारक ,कर्मचाऱ्यांची उपस्थिती होते.
error: Content is protected !!