पारा– ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने व मुख्याध्यापक एन.बी.सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय पारा,ता.वाशी येथे दिनांक १ ऑगस्ट २०२५ रोजी डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या निमित्ताने दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी सहाय्यक शिक्षक भराटे एस.डी.,सूर्यवंशी एन. बी.,श्रीमती मेटे एस.व्ही., वाघमारे एस.झेड.,मुरकूटे डी. व्ही.,माळी व्ही.एस.,बांगर ए.बी., मुळे डी.एस.,गवळी ए.एम.,योगेश मोरे आणि छंदर चौधरी यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन शाळेतील शिक्षक वृंदाच्या सहकार्याने पार पडले.
More Stories
माजी विद्यार्थ्यांनी जपली शाळेची नाळ;जय भवानी विद्यालयात प्रेरणादायी मार्गदर्शन व खाऊ वाटप
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना जय भवानी विद्यालयात अभिवादन
जय भवानी विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा