August 8, 2025

अक्षय ढगे यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई येथे सहायक प्राध्यापकपदी नियुक्ती

  • अंबाजोगाई – शहरातील होतकरू आणि बहुआयामी विद्यार्थी अक्षय पांडुरंग ढगे यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीत एक उल्लेखनीय यश संपादन केले आहे.त्यांनी गुरुगोविंदसिंह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इन्स्ट्रुमेंटेशन या शाखेत अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी विधी शिक्षणाकडे वाटचाल करत गव्हर्नमेंट लॉ कॉलेज (GLC),मुंबई येथून एल.एल.बी.पदवी यशस्वीरित्या पूर्ण केली.
    यावर पुढे अभ्यास करत त्यांनी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी (NLU) येथून एल.एल.एम.ही पदव्युत्तर पदवी मिळवली.यासोबतच त्यांनी केंद्रीय UGC द्वारा घेतली जाणारी नेट (NET) परीक्षा देखील यशस्वीरित्या उत्तीर्ण केली असून, कायद्याच्या क्षेत्रातील त्यांच्या सखोल ज्ञानाची पावती मिळवली आहे.
    ढगे सध्या मुंबई उच्च न्यायालयात वकील म्हणून प्रॅक्टिस करत होते. विधी शिक्षण क्षेत्रात योगदान देण्याच्या त्यांच्या इच्छेप्रमाणे आता त्यांची शासकीय विधी महाविद्यालय,मुंबई (Govt. Law College, Mumbai) येथे सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
    त्यांच्या या शैक्षणिक आणि व्यावसायिक यशामुळे सामाजिक स्तरावर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून,अनेक होतकरू विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्रोत ठरत आहेत.
    बहुजनांच्या न्याय हक्कासाठी कळंब शहरातून प्रकाशित होत असलेला सा.साक्षी पावनज्योत परिवाराच्या वतीने त्यांची अभिनंदन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!