कळंब – संत शिरोमणी सावता महाराज यांची पुण्यतिथी आज महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी येथे अत्यंत भक्तिभावाने आणि सामाजिक एकोप्याच्या वातावरणात साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम संत शिरोमणी सावता महाराज बचत गट व महात्मा फुले अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र खडबडे होते.यावेळी उपाध्यक्ष बिभीषण यादव,सचिव अरुण माळी,ज्येष्ठ मार्गदर्शक टी.जी.माळी,संचालक मोहिते दादा,जंत्रे भाऊ,व इतर मान्यवर उपस्थित होते. या वेळी बचत गटाचे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने बचत गटातील सदस्यांना बोनस वाटप करण्यात आले. उपस्थित सदस्यांमध्ये गरड,शेळके,विशाल पाटील, बाबासाहेब पाटील,आकाश माळी, धीरज दुधाळ,भरत शिंदे,अनुराधा बोरगे,रेहाना शेख,सौ.पूजा बचुटे, सौ.आरती गायकवाड,सौ.पुनम गायकवाड,सौ.महानंदा बोरगे आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत नेटकेपणाने व प्रेरणादायी वातावरणात पार पडले. उपस्थित सर्व मान्यवरांनी सावता महाराजांच्या कार्याचे स्मरण करून समाज प्रबोधनाचे महत्व अधोरेखित केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले