August 9, 2025

” कळंब देवराई ” नगरपरिषदेच्या वतीने १२ हजार वृक्षांची होणार लागवड

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) –
    जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येत असलेल्या”हरित धाराशिव” अभियानां अंतर्गत जिल्ह्यात एकाच दिवशी १५ लाख वृक्ष लागवड करण्यात येत असून या कार्यक्रमांतर्गत कळंब येथे नगर परिषदेच्या वतीने आज शनिवार दि.१९ जुलै रोजी दिवसात १२००० वृक्षाची लागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
    कळंब शहरातील सर्वे नं ३ येथील सार्वजनिक मांजराकाठ स्मशानभूमी येथे सकाळी ६.०० वाजता हा वृक्षारोपण कार्यक्रम होणार आहे. जिल्हा प्रशासानाच्या सर्व विभागांच्या पुढाकारातून धाराशिव जिल्ह्यात हा महत्वकांक्षी संकल्प राबविला जात असून
    या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि सर्वानी सहभाग द्यावा,ही अपेक्षा आहे.कळंब करासाठी किमान ४० गुंठे एवढ्या क्षेत्राची “कळंब देवराई”
    निर्माण होऊन,हा सृष्टीचा ठेवा पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणीय वारसा ठरेल,यासाठी या उपक्रमात नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन कळंब नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मंजुषा गुरमे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
    कळंब नगरपरिषद,वन विभाग व स्थानिक प्रशासानाच्या संयुक्त विद्यमाने लागवडीची सर्व
    पूर्वतयारी पूर्ण झाली असून, लागवडीसाठी आवश्यक रोपे, खते,पाणीपुरवठा व संरक्षक
    साधनांची व्यवस्था करण्यात आली आहे.
    या उपक्रमामुळे परिसरात जैवविविधतेत वाढ होणार
    असून,नागरिकांना निसर्गाशी आपले नाते घट्ट
    करण्याची संधी मिळणार आहे. वृक्ष लागवड ही काळाची गरज असून महाराष्ट्रात २०% वनक्षेत्र आहे प्रत्यक्षात हे वनक्षेत्र ३३ % असणे गरजेचे आहे धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर फक्त १ % वनक्षेत्र आहे आपल्या जिल्ह्याचे वन क्षेत्राचे प्रमाण अति अल्प आहे यासाठी गरज आहे वृक्ष लागवडीची व त्याच्या संवर्धनाची हे कार्य
    भविष्यासाठी पुढील पिढीसाठी एक हरित भेट ठरणार आहे. कळंब तालुक्यात १ लाख ,५१ हजार ८०० व कळंब नगर परिषदेच्या वतीने १२००० एकूण १ लाख ६३ हजार ८०० वृक्ष रोपांची लागवड करण्यात येणार असून २० गुंठे जागेत ३३०० वृक्षारोप याप्रमाणे ४६ ठिकाणी ही रोपे जपानी वनस्पती शास्त्रज्ञ मिया वाकी यांनी विकसित केलेल्या पद्धतीनुसार लावण्यात येणार आहेत यामध्ये तीन वृक्षारोपे वेगवेगळ्या उंचीची असतात व त्यांची वाढ एक दुसऱ्यास अडचण ठरत नाही तालुक्यातील वृक्षारोपणाची तयारी तहसीलदार हेमंत ढोकळे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे अशी माहिती नायब तहसीलदार गोकुळ भराडीया यांनी दिली.
  • ## या वृक्षाची होणार लागवड, चिंच काटेसावर,पिंपळ,जांभूळ, कवठा,अशोक,पळस,मिलीया, डुबिया,भोकर,अर्जुन, वावळा, आवळा,शेवगा,हादगा,कंचन ,करंज, सिताफळ,कडीपत्ता, पेरू ,बोर ,बांबू, तुळस, पारिजा,सदाफुली,कोरफड, जाई – जुई,अडुळसा,मेहंदी ,सर्पगंधा, इत्यादी .
error: Content is protected !!