लातूर – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, क्रीडा विभाग, कुस्ती प्रशिक्षण केंद्र, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २० ते २५ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये अखिल भारतीय आंतर विद्यापीठ फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन कुस्ती प्रशिक्षण निवड चाचणी शिबिर आयोजित करण्यात आहे. या शिबिरात विजेत्या कुस्ती स्पर्धकांना तांत्रिक आणि शास्त्रशुद्ध कुस्तीचे प्रशिक्षण दिले जात आहे. या निवड चाचणी शिबिरात निवड झालेल्या कुस्ती स्पर्धकांच्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ फ्रीस्टाइल व ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा दि. २८ नोव्हेंबर ते ०१ डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये चंदीगड युनिव्हर्सिटी, मोहाली (पंजाब) येथे संपन्न होणार आहेत. या शिबिराला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई आणि उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे यांनी नुकतीच भेट देऊन विजेते कुस्ती स्पर्धक,पालक आणि प्रशिक्षकाचा सत्कार केला. यावेळी विचारमंचावर निवड चाचणी समिती सदस्य डॉ. मधुकर क्षिरसागर, डॉ. विठ्ठल डुमनर, पंच अण्णासाहेब मुळे, विष्णू भोसले, भरत कराड, शिवराज हाके, विष्णू तात्पुरे, प्रा.आशीष क्षीरसागर, पालक मकबूल सरनोबत, विजय मोरे आणि ईश्वर सिंग बावरी यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई म्हणाले की, मराठवाड्याने कुस्तीमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, नांदेड यांनी निवड चाचणी शिबिराची आमच्या महाविद्यालयाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानून या प्रशिक्षणामध्ये कुस्ती खेळाडूंना तज्ञ प्रशिक्षकाच्या माध्यमातून उत्तम पद्धतीने मार्गदर्शक केले जाणार असल्यामुळे चंदिगड विद्यापीठ, मोहाली (पंजाब) येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या विद्यापीठाला सुवर्णपद प्राप्त होईल असा आशावादही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी प्रास्ताविक करताना उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे म्हणाले की, महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम, समाजकार्य आणि संगणक या सहा शाखांमधून दर्जेदार व गुणात्मक शिक्षण दिले जाते. यामध्ये क्रीडा विभागाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. महाविद्यालयातील कुस्ती प्रशिक्षण केंद्रातून आजपर्यंत विविध पारितोषिक प्राप्त गुणवंत खेळाडूंना प्रशिक्षित करून त्यांनी महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविला आहे असे सांगून उपस्थित सर्व प्रशिक्षक, शिक्षक, पालक, स्पर्धक यांचे त्यांनी अभिनंदन करून पुढील कार्याला हार्दिक शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आशिष क्षीरसागर यांनी केले तर आभार प्रा. विष्णू तात्पुरे यांनी मानले. यावेळी मुंतजीर सरनोबत, संकेत पाटील, ज्ञानेश्वर पाटील आणि अनुज पाटील या गुणवंत कुस्ती पटूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या निवड चाचणी शिबिरात ज्ञानेश्वर पाटील, ओकार मारतळे, अजय जाधव, हरीदास गायकवाड, संकेत पाटील, ऋषिकेश दूधभाते, ज्ञानेश्वर महानवर, गणेश साळुंके, योगीराज नागरगोजे, दीपक वडजकर, आकाश गड्डे, सय्यद अन्वर अहमद अली, सागर कदम, प्रल्हाद राठोड, विजय चव्हाण, अनुप पाटील, मुमताजजीर सरनोबत, प्रदीप गोरे आणि दलवीर सिंग बावरी आदि कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे