भाट शिरपूरा– महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्षनेते,तसेच राज्यसभा व लोकसभेचे माजी खासदार दिवंगत भाई उद्धवराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाट शिरपुरा येथील भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमात भाई उद्धवराव पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धाराशिव जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे होते. मुख्याध्यापक टेकाळे यांनी आपल्या भाषणात भाई उद्धवराव पाटील यांच्या समाजकार्यातील योगदानाचे महत्व सांगितले.त्यांनी सांगितले की,”भाई पाटील यांना सत्ताधारी काँग्रेसने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली होती,मात्र त्यांनी ती नाकारून विरोधी पक्षात राहून शेतकरी,कामगार,शेतमजूर व दुर्बल घटकांसाठी कार्य करण्याचा निश्चय केला.त्यांच्या भाषणाचे वजन इतके होते की विधानमंडळात ते बोलत असताना मुख्यमंत्री आणि सर्व आमदार ऐकण्यासाठी उपस्थित राहत. या कार्यक्रमास संस्थेचे सचिव बाळकृष्ण धस,शाळेतील शिक्षक एस.जी.सूर्यवंशी,एच.ए.पानढवळे, एस.एस.डिकले,कर्मचारी व्ही. एम.शिंदे,व्ही.एस.चाळक,ज्येष्ठ पत्रकार शिवाजी सावंत,तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन सूर्यवंशी यांनी केले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले