August 8, 2025

मोहा येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशन,अंबाजोगाई व सेवा सहयोग फाउंडेशन,पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ४० गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किटचे वाटप करण्यात आले.
    या उपक्रमामध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रजिस्टर,कंपास,स्कूल बॅग आदी शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक प्राचार्य अविनाश मोरे होते.प्रमुख अतिथी म्हणून ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे ज्येष्ठ संचालक तात्यासाहेब पाटील,ग्रामशक्ती वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष ज्योतीराम सोनके,सतीशदादा मडके,संजय मडके,कमलाकर शेवाळे,उषा पांचाळ, धनंजय परजणे,अमरसिंह पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
    या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मनोबल वाढून त्यांना शिक्षणासाठी आवश्यक आधार लाभला आहे.उपस्थित मान्यवरांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!