मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी,सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली,निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले मुख्य संपादक सुभाष द.घोडके यांच्या लेखणीने साकारलेला “सा.साक्षी पावनज्योत” ह्या साप्ताहीकाचा शिक्षणतज्ञ डॉ.अशोकराव मोहेकर वाढदिवस विशेषांक प्रकाशित करण्यात आला. उत्कृष्ट मुद्रण व वैचारिक संपृक्ततेने सजलेला हा विशेषांक ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे दि.३ जुलै २०२५ रोजी प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर आणि प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते प्रकाशीत करण्यात आला. याप्रसंगी कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांनी या विशेषांकाच्या उद्दिष्टाबाबत सांगताना स्पष्ट केले की, “शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी स्थापन केलेल्या शाळा आणि महाविद्यालयांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे ‘सा. साक्षी पावनज्योत’ या वृत्तपत्राद्वारे समाजात प्रसिद्ध होत असून त्यांच्या गुणवत्तेचे कौतुक करण्यात येते.
“यावेळी कार्यक्रमास मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे,प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर,पर्यवेक्षक डी.बी.मडके,उच्च माध्यमिक विभागाचे प्रा.सुनील साबळे,प्रा.नवनाथ करंजकर,प्रा. राहुल भिसे,प्रा.देवदत्त पाटील,प्रा.रोहित मोहेकर,प्रा. शेखर गिरी, प्रा.अमित जाधव,अनुप पाटील,सहशिक्षक सतिश मडके,मंगलदास पवार,शैलेश गुरव,अशोक राऊत विद्यालयातील सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न