August 8, 2025

चितेगाव येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

  • चितेगाव – जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, चितेगाव येथे लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली.
    या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रमिथ फाऊंडेशनचे ज्ञानेश्वर किसनराव हावळे (कन्हेरवाडीकर) यांना निमंत्रित करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पूजन करून करण्यात आली.
    शाळेतील विद्यार्थ्यांना शाहू महाराज यांच्या सामाजिक न्याय, शिक्षण प्रसार, शेती सुधारणा, जलसंधारण, जंगल संवर्धन व आरक्षण धोरण यासारख्या कार्यांविषयी माऊली सरांनी प्रभावी मार्गदर्शन केले. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत समानता आणि सामाजिक समरसतेचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला.
    कार्यक्रमात केंद्रीय मुख्याध्यापक विनय साबळे, माजी केंद्र प्रमुख राजेंद्र डूकरे, शिक्षक सुभाष पारवे, सहशिक्षिका काळवीट व गवळी, तसेच प्रमिथ फाऊंडेशनच्या ज्योती शिंदे मॅडम उपस्थित होत्या.
    कार्यक्रमाचा समारोप व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आला, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारीची भावना जागृत होण्यास मदत झाली.
error: Content is protected !!