February 8, 2026

श्री माधवराव भोसले माध्यमिक विद्यालयात सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा

  • मातोळा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळ्याचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य अजित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तालुक्यातील मातोळा येथील श्री माधवराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.२६ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त सामाजिक न्याय दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
    कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य अजित साळवे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.यानंतर सामाजिक न्याय, समतेचा विचार आणि शाहू महाराजांच्या कार्याचा गौरव करत मार्गदर्शनपर भाषणे झाली.
    या कार्यक्रमास पर्यवेक्षक डबे, ज्येष्ठ शिक्षक भोसले,तसेच सहशिक्षक कुंभार,लहाने,मुळे, पांचाळ,शेख,बटगिरे,शिनगारे, कोहाळे,गोटे,अनिगुंटे,प्रशांत भोसले,शिंगटे,मोरे,कोपरकर, सहशिक्षिका श्रीमती दाणी,श्रीमती दिवे,श्रीमती कदम,श्रीमती चेनलवाड,तसेच शाळेचे शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    या कार्यक्रमाच्या आयोजनातून विद्यार्थ्यांना सामाजिक समतेचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.तसेच छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश यामागे होता.
error: Content is protected !!