मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य अविनाश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहा येथील ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दि.१६ जून २०२५ रोजी राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयातील प्रा.जाकीर काझी तसेच लातूर विभागातून मराठी विषयात प्रथम आलेल्या विद्यार्थीनीचे मार्गदर्शक प्रा.राहुल भिसे यांचा सत्कार संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर व प्राचार्य अविनाश मोरे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.त्यानंतर छत्रपती शिवाजी महाविद्यालय कळंब येथून आलेल्या प्रा.डॉ.हनुमंत माने, प्रा. डॉ.यू.एस.गंभीरे,प्रा.डॉ.महेश पवार,प्रा.एस.एल.चौधरी आणि प्रा.आर.एम.चोरघडे यांनी नवनियुक्त मुख्याध्यापक तथा प्राचार्य अविनाश मोरे यांचा सत्कार केला.
याप्रसंगी रमेशभाऊ मोहेकर, प्रा.जाकीर काझी,प्रा.डॉ.हनुमंत माने यांनी आपले मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी पर्यवेक्षक डी.बी. मडके,प्रा.सुनील साबळे,सुर्यकांत गुंगे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शेखर गिरी यांनी केले तर आभार प्रा.नवनाथ करंजकर यांनी मानले.
More Stories
महिला सर्वच क्षेत्रात प्रगतीपथावर;उद्योजक होऊ इच्छिणाऱ्या महिलांना मोहेकर मल्टीस्टेटची साथ – हनुमंत मडके
मोहा येथे ‘जागतिक महिला दिना’निमित्त आरोग्य शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा सत्कार
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन