September 24, 2026

विद्याभवन हायस्कूल येथे प्रवेशोत्सव उत्साहात साजरा

  • कळंब (विशाल पवार) – ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या मार्गदर्शनानुसार विद्याभवन हायस्कूल कळंब येथे १६ जून २०२५ रोजी प्रवेशोत्सव अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०२५- २६ चे नविन विद्यार्थ्यांचे स्वागत विद्यार्थ्यांना पुस्तके,पुष्पगुच्छ वाटप करून करण्यात आले.
    यानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्हि.जी, प्रशालेचे उपमुख्याध्यापक मायाचारी व्ही. एस ,पर्यवेक्षक आनिगुंठे जगदेवी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक,पत्रकार समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती होती.
error: Content is protected !!