March 26, 2026

स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार महिला शेतकरी शेख परवीन फकरुद्दीन यांना जाहीर

  • कळंब – कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येणारा स्व.राजेंद्र मुंदडा कृषी वैभव पुरस्कार निपाणी ता.कळंब येथील महिला शेतकरी शेख परवीन फकरुद्दीन यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केला आहे.
    या पुरस्काराचे हे चौथे वर्ष आहे. गेल्या तीन वर्षांपासून कळंब तालुक्यातील शेती मध्ये अभिनव प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यास पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.या पूर्वी नामदेव माकोडे,लिंबा नाना चोंदे,अप्पासाहेब काळे यांना सन्मानित करण्यात आले होते.
    या वर्षी शेती मध्ये विविध प्रयोग करून,शेतकऱ्या पुढे आदर्श निर्माण करणाऱ्या निपाणी तालुका कळंब येथील महिला शेतकरी परवीन फकरुद्दीन शेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.
error: Content is protected !!