March 26, 2026

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये रोलर पूजन उत्साहात संपन्न

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर ॲग्रो इंडस्ट्रीज,मोहा ता.कळंब येथे दिनांक ५ जून २०२५ रोजी रोलर पूजन सोहळा अत्यंत उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला.
    या पूजन कार्यक्रमास मंडळाचे प्रशासकीय अधिकारी रमेशभाऊ मोहेकर,आदरणीय चेअरमन हनुमंत मडके,कार्यकारी संचालक डॉ.संतोष मडके,कार्यकारी अधिकारी विशाल मडके, संचालक भारत जोशी,संचालक प्रा.बापूराव शेळके,प्रमोद मडके धनंजय मडके रोहित मोहेकर फुलचंद मडके तसेच संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
    रोलर पूजनाच्या निमित्ताने ॲग्रो इंडस्ट्रीजमध्ये नवचैतन्य, एकत्रितता व कामातील ऊर्जा संचारल्याचे वातावरण निर्माण झाले होते.सर्वांनी पूजनाचे धार्मिक व कर्मयोगी महत्त्व जाणून,एकात्मतेची भावना व्यक्त केली.कार्यक्रमाचे संचालन अत्यंत नेटके तरतरीत झाले असून,उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाने कर्मचाऱ्यांमध्ये नवा उत्साह संचारला.
error: Content is protected !!