धाराशिव – शेकापूर (ता. धाराशिव) येथील ग्रामपंचायतीने आज मोठा निर्णय घेत महावितरण (MSEDCL) कार्यालयावर थेट कुलूप लावून सिल करण्याची कारवाई केली. शेकापूर ग्रामपंचायतीचा कर तब्बल 84 लाख 65 हजार रुपये थकित असल्याने व महापारेषण कार्यालयाकडूनही 28 लाख 40 हजार 400 रुपये थकबाकी असल्याने ही कडक पावले उचलण्यात आली आहेत. या अगोदर १६ मे रोजी महावितरण व महापारेषण या दोन्ही कार्यालयांना कर भरण्यासाठी ७ दिवसांची नोटीस देण्यात आली होती.मात्र मुदत संपल्यानंतरही कर न भरल्याने ग्रामपंचायतीने २४ मे रोजीच थेट कारवाई करत कार्यालयावर कुलूप ठोकले. ग्रामपंचायतीच्या या कडक भूमिकेमुळे इतर थकबाकीदार कार्यालयांवरही दडपण येण्याची शक्यता आहे. महसुलाच्या वसुलीसाठी शेकापूर ग्रामपंचायतीने दाखवलेला हा दृढ निर्धार आता चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी सरपंच पुष्पा किरण लगदिवे, ग्रामसेवक संजय आडे , सदस्य लगदिवे, फेरे अम्रपाली , राणी बुरुड, मजुषार कुरकरे , कांचन होवडे , पोलीस पाटील मल्हारी कांबळे , ग्रामस्थ नंदू लोकदिवे , शक्ती कांबळे , अरुण साबळे ,राहुल विधाते , सुरज लगदिवे,शिवा लगदिवे , शिवाजी विधाते व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी