धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.23 मे रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 293 कारवाया करुन 2,20,200 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
वाशी पोलीस ठाणे:आरोपी-कमलाबाई लाला काळे, वय 40 वर्षे, रा.सरमकुंडी ता. वाशी जि. धाराशिव या दि.23.05.2025 रोजी 07.15 वा. सु.आपल्या राहत्या घराचे बाजूला पत्र्याचे शेडसमोर अंदाजे 13,350 ₹ किंमतीची 200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 25 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी-ताईबाई राजेंद्र काळे, वय 28 वर्षे, रा.पारडी ता. वाशी जि. धाराशिव या दि.23.05.2025 रोजी 15.10 वा. सु.गोलेगाव शिवारात इसरुप कडे जाणारे रोडचे राहते पत्राचे शेडसमोर अंदाजे 4,500 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये वाशी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
भुम पोलीस ठाणे:आरोपी-फुलबाई लहु काळे,वय 40 वर्षे, रा. हिवरा ता. भुम जि. धाराशिव या दि.23.05.2025 रोजी 17.15 वा. सु.हिवरा गावात रोडचे बाजूस एका पत्राचे शेडमध्ये अंदाजे 3,500 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.23.05.2025 रोजी 13.40 वा. सु. भुम पो ठाणे हद्दीत होळकर चौक कळंब रोडच्या बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सलीम ईब्राहिम बागवान, वय 30 वर्षे, रा. गांधीनगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे 16.18 वा. सु. होळकर चौक कळंब रोडच्या बाजूस कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 760 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ गोवंसीय जनावरांची कत्तल करुन मांस जवळ बाळगणाऱ्यावर व गुन्हा दाखल.”
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-फारुक इब्राहिम कुरेशी, वय 43 वर्षे,इरशाद चॉद कुरेशी, वय 28 वर्षे, रा. पल्ला गल्ली परंडा ता.परंडा जि. धाराशिव, यांनी दि.23.05.2025 रोजी 06.00 वा.सु.पल्ला गल्ली कुर्डवाडी रोड परंडा येथे गोवंशीय जनावरांची कत्तल करुन स्वत:च्या फायद्यासाठी विक्री करण्यासाठी 500 किलो जवळ बाळलेले व 7 गोवंशीय वासरे असे एकुण 1,35,000₹किंमतीचे गोवंशीय जनावरांचे पालन पोषन न करता क्रुरतेने डांबून ठेवलेले परंडा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द कलम 5(क),9, 9(अ) (ब) महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सह कलम 11(1), 11(1)(च),11(1)(ज), 11(1)(झ) प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“गुंगीकारक गांजा चिलीम मध्ये भरुन सेवन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-उध्दव पांडुरंग पांचगे, वय 37 वर्षे, रा. हिप्परगा राव ता. उमरगा जि. धाराशिव,महेश कमलाकर वाडेकर, वय 31 वर्षे, रा. हिप्परगा राव ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.23.05.2025 रोजी 13.50 ते 13.55 वा. सु. उमरगा येथे हुतात्मा स्मारकाचे गार्डन मध्ये झाडाखाली नमुद आरोपी हे गुंगीकारक गांजा पदार्थ चिलीम मध्ये भरुन सेवन/ ओढत असताना उमरगा पोलीसांना मिाळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द एन.डी.पी.एस अफक्ट 1985 कलम 8 (सी), 27 अन्वये उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
ढोकी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-संभाजी शाहु खांडेकर, वय 46 वर्षे, रा. येवती ता. जि. धाराशिव यांचे दि.19.05.2025 रोजी 19.30 ते 20.30 वा. सु. शेत गट नं 31 मधील पत्र्याचे शेडमध्ये बांधुन ठेवलेले दोन बोकड व दोन शेळ्या असा एकुण 45,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संभाजी खांडेकर यांनी दि.23.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
येरमाळा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-भाग्यश्री मच्छिंद्र तोरगले, वय 23 वर्षे, रा.ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांचे दि.22.05.2025 रोजी 10.00 ते 11.00 वा. सु. कळंब पुणे एस.टी. बसने पुणे येथे जात असताना येरमाळा येथे आली असता भाग्यश्री तरेगले यांचे पर्स मधील 20 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन अंदाजे 1,27,570₹ किंमतीची अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भाग्यश्री तोरगले यांनी दि.23.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-अभिमन्यु भगवान माळी, वय 53 वर्षे, रा.कोर्ट कॉलनी सांजा रोड धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची होंन्डा शाईन कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.आर. 2942 ही दि.16.05.2025 रोजी 08.30 ते 18.00 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अभिमन्यु माळी यांनी दि.23.05.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बबलु श्रीमंत अडसुळ, अभिषेक कळबंडे दोघे रा. क तडवळे ता. जि. धाराशिव यांनी दि. 21.05.2025 रोजी 12.50 वा. सु. क तडवळे येथील आठवडी बाजार येथे फिर्यादी नामे-भाउ सोपान मणके, वय 35 वर्षे, रा. कसबे तडवळा ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-भाउ मणके यांनी दि.23.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2),118(1), 351(2), 351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“शासकीय कामात अढथळा निर्माण करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
लोहारा पोलीस ठाणे :आरोपी नामे-नितीन बालाजी जाधव, रा. मोघा बु. ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि. 21.05.2025 रोजी 16.00 वा. सु. लोहारा येथील तहसील कार्यालय येथील पुरवठा विभाग रुम मध्ये फिर्यादी नामे-एैश्वर्या जितेंद्र जाधव, वय 24 वर्षे, व्यवसाय पुरवठा निरीक्षक तहसील कार्यालय लोहारा रा.माळेवाडी ता. आटपाडी जि. सांगली या करत कार्यालयात कामकाज करीत असताना नमुद आरोपीने टेबल जवळ येवून शामल धनराज माटे यांची राशनकार्डची योजना बदलून मिळणे बाबतची फाईल तुमचे कार्यालयास जमा आहे त्या फाईलचे काय झाले असे म्हणून अंगावर धावून येवून शिवीगाळ करुन फाईल हिसकावून घेतली व सदर फाईल मधील कागदपत्रे काढून घेवून शासकीय कामात अडथळा निर्माण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-एैश्वर्या जाधव यांनी दि.23.05.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 132, 79, 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
अतिश वाघमारे यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती
धाराशिव जिल्हा पोलीसनामा
संकल्प ते सिद्धी’ अंतर्गत धाराशिव भाजपचा जनता दरबार