धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.15 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 113 कारवाया करुन 72,800 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
कळंब पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)संजय किसन शेळके, वय47वर्षे, रा. इंदीरानगर कळंब ता. कळंब जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 12.45 वा. सु. आपल्या राहात्या घरासमोर अंदाजे 2,940 ₹ किंमतीची 49 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 2) बाळासाहेब कोडींबा आडसुळ, वय 55 वर्ष रा. भोगजी, ता.कळंब, जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 11.30 वा. सु. हॉटेल येडेश्वरी समोर भोगजी येथे अंदाजे 700 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या.तर 3)शालु विजय पवार, वय23वर्षे, रा. जुनी दुध डेअरी कळंब ता. कळंब जि. धाराशिव या दि.15.11.2023 रोजी 13.35 वा. सु. जुनी दुध डेअरी कळंब येथे अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 40 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 4)स्वाती पिंटु काळे, वय,30वर्षे, रा. मोहा पारधीपीडी ता. कळंब जि. धाराशिव या दि.15.11.2023 रोजी 17.15 वा. सु. मोहा येथे अंदाजे 6,000 ₹ किंमतीचे 150 लि. गावठी दारु निर्मीतीचे रसायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदविले आहेत.
धाराशिव शहर पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)अय्युब मलंग तांबोळी, वय 45 वर्षे, रा. फकीरा नगर वैराग नाका धाराशिव ता.जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 17.05 वा. सु. प्रेमचंद बनसोडे यांचे घरासमोर भिमनगर धाराशिव येथे अंदाजे 2,280 ₹ किंमतीची 38 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)तिरुपती परशुराम उत्कम, वय 36 वर्षे, रा. कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 15.50 वा. सु. आपल्या राहात्या घरात अंदाजे 1,440 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
नळदुर्ग पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)महेबुब घुडुलाल शेख, वय 43 वर्षे, रा.अंदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 18.30 वा. सु. वेलकम हॉटेलच्या डाव्या बाजूला अंदाजे 2,150 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई)अन्वये नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
मुरुम पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)सिद्राम विठ्ठल बनसोडे, वय 50 वर्षे, रा. आनंदनगर, ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 17.30 वा. सु. मुरुम आठवडी बाजार येथील एका टपरीमध्ये अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर2) बापु तिपन्ना कागे, वय 42 वर्ष रा. भोसगा, ता.लोहारा, जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 18.50 वा. सु. आष्टामोड उमरगा ते सोलापूर रोड लगत असलेल्या पान टपरी समोर अंदाजे 2,400 ₹ किंमतीची 24 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये मुरुम पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
बेंबळी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)रंजना अरुण शिंदे, वय 40 वर्षे, रा. पारधीवस्ती तुळजापूर खुर्द ह.मु. केशेगाव साखर कारखान्याजवळ ता. जि. धाराशिव या दि.15.11.2023 रोजी 17.40 वा. सु. केशेगाव साखर कारखान्याजवळ अंदाजे 2,800 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. तर 2) गोरख तायप्पा बंडगर, वय 52 वर्ष रा. उमरेगव्हाण ता. जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 19.00 वा. सु. हॉटेल महालक्ष्मी मध्ये केशेगाव कारखान्याजवळ अंदाजे 1,220 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 11 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत
“ जुगार विरोधी कारवाई.”
आंबी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान आंबी पोलीसांनी दि.15.11.2023 रोजी 18.00 वा. सु. आंबी पो. ठा. समाज मंदीराचे आडोशाला शेळगाव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)अनिल भगवान कंगले, रा. शेळगाव ता. परंडा जि. धाराशिव, हे समाज मंदीराचे आडोशाला शेळगाव येथे सुरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये आंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-1) बालाजी रामराव लोहार, रा. हमीद नगर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.15.11.2023 रोजी 13.15 वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 4519 ही हैद्राबाद रोडवर डिवायडरच्या उजव्या बाजूस रस्त्यावर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे : आरोपी नामे-अंबादास दत्तु मोरे, वय 22 वर्षे, रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी 20.15 वा.सु. अशोक लिलॅड टॅम्पो क्र एमएच 25 एजे 2263 मध्ये 4 खोंड व 2 गाई असे एकुण 6 जनावरे क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने भरुन जनावरांना चारापाण्याची अगर औषधपाण्याची सोय नसताना अरुंद जागेत दोरीने निर्दयपणे टॅम्पो मध्ये भरुन घेवून जात असतांना उमरगा पो.ठा.च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यांना निर्दयपणे वागणूक कायदा कलम 11 (ढी(ई) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा कलम- 5, 5(ए), 5(बी), 9, प्राण्याचे परिवहन अधिनियम कलम 47, 54, 56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मारहाण.”
आंबी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)भैरु विठ्ठल शिंदे, रा. मलकापूर ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.14.11.2023 रोजी 14.30 वा. सु. मलकापूर येथे फिर्यादी नामे- शिवाजी धोंडीबा शिंदे, वय 48 वर्षे, रा. मलकापूर ता. परंडा जि. धाराशिव यांना कौटुंबिक वादाचे कारणावरुन नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- शिवाजी शिंदे यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 324, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)शिवाजी सितराम सरवदे, 2) बब्रुवान सिताराम सरवदे, 3) आदेश बब्रुवान सरवदे, 4) करण बब्रबवान सरवदे सर्व रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.11.11.2023 बलसुर येथे फिर्यादी नामे- सुभाष सिताराम सरवदे, वय 45 वर्षे, रा. बलसुर, ता. उमरगा जि. धाराशिव यांना आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन व शेतीच्या वादातुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विळ्याने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुभाष सरवदे यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ रस्ता अपघात.”
शिराढोण पोलीस ठाणे : मयत नामे- झुंबर मच्छिंद्र ओव्हाळ, 2) भाउसाहेब उत्तमराव गांधले, रा. कडकनाथवाडी, ता. वाशी जि. धाराशिव हे दोघे दि 11.11.2023 रोजी 17.00 वा. सु. घारगावाचे अलीकडे व्यंकट आबाराव साळुंके यांचे शेताजवळुन मोटरसायकल क्र एमएच 23 व्ही 2990 वरुन जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 एवाय 1630 च्या चालक आरोपी नामे- महादेव लक्ष्मण गिरी, रा. वाकडी, ता. कळंब जि.धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चुकीच्या दिशेने चालवून झुंबर ओव्हाळ यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या आपघातात झुंबर ओव्हाळ, भाउसाहेब गांधले व आरोपी नामे- महादेव लक्ष्मण गिरी हे तिघे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी आदेश झुंबर ओव्हाळ, वय 27 वर्षे, रा. कडकनाथवाडी ता. वाशी, जि. धाराशिव ह.मु. महसुल कॉलनी कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे : मयत नामे- शंकरराव विठ्ठल इटकळे, वय 48 वर्षे, रा. अरबळी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि 13.11.2023 रोजी 09.00 वा. सु. धनगर वाडीपाटीचे जवळ महादेव घोडके यांचे शेताजवळून लूना मोटरसायकल क्र एमएच 25 एयु 3309 ही वरुन जात होते. दरम्यान कार क्र एमएच 01 बी बी 8235 चा चालक आरोपी नामे- रोहीदास अशोक वाघमारे, रा. तावशीगड ता. लोहारा जि.धाराशिव ह.मु. सर्वे नं 660/2 राजीव गांधी नगर प्रियदर्शनी चाळ जवळ बीबवेवाडी पुणे यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून शंकरराव विठ्ठल इटकळे यांचे लूना मोटरसायकलला पाठीमागून धडक दिली. या आपघातात शंकरराव इटकळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी सिध्दाराम अशोक इटकळे, वय 35 वर्षे, रा. केरुर ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.15.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात