March 26, 2026

धम्म प्रशिक्षण शिबीर व धम्ममित्र समारोह संपन्न

  • लातूर – येथे दिनांक 9 मे 2025 ते 13 मे 2025 या कालावधीत धम्मचारी संघभद्र यांच्या नेतृत्वात “धम्मामुळेच आपण बदलू शकतो” या विषयावर धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. शिबिरात ध्यान,पूजा,तसेच बुद्ध, धम्म,संघ या विषयावर अनुक्रमे धम्मचारी ज्ञानपालित,धम्मचारी धम्मभूषण,धम्मचारी अनोमरत्न यांची रात्रीची प्रवचने झाली.
    दररोज दुपारी भवचक्र या विषयावर अनुक्रमे ध.अनोमरत्न, ध.कल्याणदस्सी,ध.विबोध यांची अभ्यासपूर्ण प्रवचने झाली.
    बुद्ध पौर्णिमेनिमित्त दि.13 मे 2025 रोजी धम्मचारी बोधिछंद, पुणे यांचे रसाळ,ओघवत्या वाणीत मंत्रमुग्ध करणारे प्रवचन संपन्न झाले.दुपारी दोन्ही केंद्रातील 2 महिला व 9 पुरुष अशा 11 धम्म सहायकांचा मित्र समारोह धम्मचारी कल्याणदस्सी यांच्या हस्ते संपन्न झाला.
    शिबिरात धाराशिव- लातूर व इतरही ठिकाणावरून 65 शिबिरार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!