June 20, 2025

माणसाने माणसाशी माणसासम वागावे – लेडी गव्हर्नर कमलताई गवई

  • भारताचा विकास करायचा असेल तर खऱ्या अर्थाने माणसाने माणसासारखी वागले पाहिजे.तुम्ही सर्वजण कलेक्टर होऊन तन-मन-धनाने भारतातील गोरगरिबांची खऱ्या अर्थाने सेवा केली पाहिजे. सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे.असे उद्गार सुप्रसिद्ध समाजसेविका मा.लेडी गव्हर्नर व उच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश न्यायमूर्ती श्री भूषण गवई यांच्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई यांनी अमरावती येथे काढले. अमरावतीच्या अमरावती महानगरपालिका व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीने मार्डी रोड वरील ग्रीन सर्कल येथे आयोजित केलेल्या मिशन आयएएस राष्ट्रीय स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरात त्या बोलत होत्या.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक आयुक्त श्री गजानन गिरके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून ठाण्याचे ए आर टी ओ श्री मोडक मिशनचे कार्याध्यक्ष श्री नरेंद्र बोरकर पुण्याचे श्री राजेंद्र इंगोले,भंडाऱ्याचे श्री शंकर पत्रे व मिशनचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे हे उपस्थित होते.याप्रसंगी डॉ.कमलताई गवई यांनी सरन्यायाधीश श्री भूषण गवई यांचा जीवन प्रवास उलगडून दाखविला.त्यांचे प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण महाविद्यालय शिक्षण कसे कसे झाले त्याबद्दल सुमारे एक तास विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
    याप्रसंगी मिशन आयएएस मध्ये सहभागी झालेले श्री मुनिराज कुथे ब्रह्मपुरी,श्री संजय काशीवार गोंदिया,श्री अशोक मुसळे चंद्रपूर ,श्री नंदकिशोर खडसे,श्री माधव रेखे, श्री शरद पुसदकर यांचा ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच या शिबिराच्या आयोजनासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले.त्या सर्वांचा यथोचित गौरव लेडी गव्हर्नर प्राचार्य डॉ. कमलताई गव ई यांच्या हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक डॉ.नरेशचंद्र काठोळे यांनी केले तर श्रीमती पल्लवी काठोळे यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली. सात दिवस चालणाऱ्या या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून शंभर मुलं सहभागी झालेले आहेत.या मुलांना या सात दिवसात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यात येणार आहे .त्यासाठी अमरावतीच्या विभागीय आयुक्त श्रीमती श्वेता सिंगल जिल्हाधिकारी श्री सौरभ कटियार,राज्य माहिती आयोगाचे आयुक्त श्री रवींद्र ठाकरे,मनपा आयुक्त श्री सचिन कलंत्री, पोलीस आयुक्त श्री नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत,जिल्हा परिषदेच्या संजिता महापात्र, उपायुक्त श्री नरेंद्र वानखडे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, श्रीमती कल्पना बारवकर सागर पाटील,नीता मुंदडा, प्राध्यापक डॉक्टर आशय रोकडे यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे.
    दिनांक 14 मे रोजी सर्व शिबिरार्थी जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय जिल्हा परिषद कार्यालय अमरावती येथील आयएएस केंद्र मनपा आयुक्त कार्यालय या ठिकाणी भेटी देणार आहेत. डॉ= पंजाबराव देशमुख आय ए एस अकादमी तर्फे गेल्या पंचवीस वर्षापासून अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून आतापर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीच्या उपक्रमामध्ये जवळपास 373 आयएएस आयपीएस आयआरएस सनदी व राजपत्रित अधिकारी सहभागी झालेले आहेत.

    — प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे संचालक मिशन आयएएस अमरावती
    9890967003

error: Content is protected !!