June 20, 2025

गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं इतर विद्यार्थी प्रेरित होतात – भागवतराव धस

  • पिंपळगाव (डोळा) (राजेंद्र बारगुले)- “गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान केल्यानं केवळ त्यांचं मनोबल वाढत नाही,तर समाजात इतर विद्यार्थीही प्रेरित होतात,” असं स्पष्ट मत ज्येष्ठ समाजसेवक भागवतराव धस यांनी व्यक्त केलं आहे.
    तालुक्यातील पिंपळगाव डोळा येथील विविध परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ग्रामपंचायतच्या वतीने हनुमान मंदिरात दि.१ मे २०२४ रोजी शालेय समिती अध्यक्ष दत्त यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

  • कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उज्वल यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.यावेळी शिक्षण विस्ताराधिकारी एस.पी. जगदाळे म्हणाले,“आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी चिकाटी,मेहनत आणि सातत्याने केलेल्या प्रयत्नांतून यश संपादन केलं आहे.अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या यशाचा गौरव करणं ही समाजाची जबाबदारी असून जि.प.शाळेमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश,पुस्तके,खाऊ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जात असून सुद्धा पालकांचा ओढा खाजगी शाळेकडेच आहे. यामुळेच खाजगीकरण वाढत आहे.

  • यावेळी मुख्याध्यापक महिंद्र रणदिवे म्हणाले की,”जेव्हा एखाद्या गुणवंत विद्यार्थ्याला व्यासपीठावर बोलावलं जातं, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जातं,तेव्हा तो क्षण केवळ त्या विद्यार्थ्यासाठी नाही,तर त्याच्यासारखे यश मिळवू इच्छिणाऱ्या अनेकांसाठी प्रेरणादायी ठरतो.”

  • त्यांनी शिक्षक,पालक आणि सामाजिक संस्था यांना आवाहन केलं की,विद्यार्थ्यांच्या छोट्या मोठ्या यशाला दाद दिली पाहिजे.पुरस्कार,प्रमाणपत्र किंवा साधं सार्वजनिक कौतुकसुद्धा त्यांच्या आत्मविश्वासात भर घालू शकतं. पालकांनी सुद्धा विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
    या कार्यक्रमात श्रीमती कोरे डी.एम,सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके,माजी चेअरमन सतीश टेकाळे,सरपंच संगीता स्वामी,उपसरपंच महेश धस,पालक,स्थानिक पदाधिकारी व विद्यार्थी उपस्थित होते.
    या कार्यक्रमाचे प्रस्तावना मुख्याध्यापक महिंद्र रणदिवे तर सूत्रसंचालन व आभार रामढवे एल.ए यांनी केले.
error: Content is protected !!