June 20, 2025

ज्ञान प्रसारक मंडळात विविध ठिकाणी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या स्वप्नपूर्तीसाठी आणि ज्ञान प्रसारक मंडळ सचिव डॉ.अशोक मोहेकर यांच्या प्रेरणेने मराठवाड्यातील ज्ञान प्रसारक मंडळाच्या विविध ठिकाणी महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

  • विद्यामंदिर हायस्कूल आष्टाचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या मार्गदर्शनानुसार दि.१ मे २०२५ रोजी विद्यामंदिर हायस्कूल आष्टा तालुका भूम येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.
    यानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शैक्षणिक वर्ष २०२५ चे विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना निकाल पत्रक वाटप करण्यात आले.
    यानिमित्त ज्येष्ठ सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव व
    शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी , पालक,पत्रकार,समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती हे उपस्थित होते.

  • विद्याभवन हायस्कूलचे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या मार्गदर्शनानुसार विद्याभवन हायस्कूल कळंब येथे १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रशालेचे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शैक्षणिक वर्ष २०२५ चे विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना निकाल पत्रक वाटप करण्यात आले.
    यानिमित्त प्रशालेचे उपमुख्याध्यापक मायाचारी व्ही एस,पर्यवेक्षक आनिगुंठे जगदेवी तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

  • मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली जय भवानी विद्यालय,पारा ता.कळंब येथे दि.१ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा उत्साहात संपन्न झाला.
    याप्रसंगी मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर शैक्षणिक वर्ष २०२५ चे विद्यार्थ्यांचे वार्षिक परीक्षेचे निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना निकाल पत्रक वाटप करण्यात आले.
    याप्रसंगी मुख्याध्यापक नवनाथ सूर्यवंशी,संदीप भराटे,सितल मेटे, सतिश वाघमारे,दिपक मुरकुटे,विकास माळी, दिपक मुळे,अमोल बांगर,शहाजी सोलंनकर,अमोल गवळी व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
error: Content is protected !!